Homeताज्या बातम्यादेश

किरकोळ महागाईचा आठ महिन्यांतील उच्चांक; जानेवारीत किरकोळ महागाई 2.75 टक्क्यांवर

नवी दिल्ली : जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून 2.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबरमध्ये हा दर 1.33 टक्के होता. त्यामुळे मागील आठ महिन्यांत

महाराष्ट्रात येणारे मोठे उद्योग गुराजतला कसे गेले : राजवर्धन पाटील
मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे ; “मराठी पाऊल पडते पुढे” या चर्चासत्रातील सूर
निलगिरी, सुरत आणि वागशीर युद्धनौका सज्ज ; नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल

नवी दिल्ली : जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून 2.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबरमध्ये हा दर 1.33 टक्के होता. त्यामुळे मागील आठ महिन्यांतील ही सर्वाधिक पातळी ठरली आहे. यापूर्वी मे 2025 मध्ये महागाई 2.82 टक्क्यांवर नोंदली गेली होती. केंद्र सरकारने गुरुवारी (12 फेब्रुवारी) महागाईची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली.
मात्र या वाढीमागे केवळ किंमतींची चढ-उतार नाही, तर महागाई मोजण्याच्या पद्धतीत केलेले महत्त्वाचे बदलही कारणीभूत ठरले आहेत. सरकारने ग्राहक किंमत निर्देशांकाचे आधार वर्ष 2012 वरून बदलून 2024 केले आहे. दशकाहून अधिक काळानंतर हा बदल करण्यात आला. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणात अर्थतज्ज्ञांनी जानेवारीतील महागाई सुमारे 2.77 टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. नव्या मालिकेत वस्तू आणि सेवांच्या वजनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जुन्या निर्देशांकात अन्नधान्य व खाद्यपदार्थांचा हिस्सा सुमारे 50 टक्के होता; तो आता 36.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. सांख्यिकी मंत्रालयाच्या मते, उत्पन्नात वाढ झाल्याने कुटुंबांचा खर्चाचा कल बदलला आहे. अन्नावरील खर्चाचा वाटा कमी होत असून गृहनिर्माण, वाहतूक, शिक्षण, आरोग्य आणि विविध सेवांवरील खर्च वाढत आहे. त्यामुळे निर्देशांकातही त्याचे प्रतिबिंब दिसते. काही कालबाह्य वस्तू निर्देशांकातून वगळण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, रेडिओ, व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर आणि टांगा-गाडीचे भाडे यांचा समावेश आता राहिलेला नाही. त्याऐवजी विमान प्रवासाचे भाडे, ऑनलाइन सदस्यता सेवा, ई-कॉमर्स खरेदी, ग्रामीण भागातील घरभाडे तसेच वीजदर यांचा समावेश करण्यात आला आहे. बदलत्या अर्थव्यवस्थेला आणि ग्राहकांच्या सवयींना अनुसरून ही पुनर्रचना करण्यात आली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

COMMENTS