Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर- मनमाड महामार्गावर युवकाचा अपघाती मृत्यू

राहाता :  रविवारी दुपारी नगर- मनमाड महामार्गावर तालुक्यातील अस्तगाव फाटा या ठिकाणी डंपर व दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. यामध्ये श्रीकृष्ण रामेश्वर त

भीषण अपघात; 2 कंटेनर दरीत कोसळले 
गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .

राहाता :  रविवारी दुपारी नगर- मनमाड महामार्गावर तालुक्यातील अस्तगाव फाटा या ठिकाणी डंपर व दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. यामध्ये श्रीकृष्ण रामेश्वर तारडे (वय १८, रा.केंदळ, ता.राहुरी ) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. डंपर बाभळेश्वर कडून राहाता रस्त्याने जात होता आणि दुचाकीस्वार आपल्या आज्जीला दवाखान्यातून घेऊन खडकेवाके गावात परतत होता. अपघात होताना आज्जी ह्या बाजूला पडल्या व तरुणाला डंपरच्या चाकाचा धक्का बसला व त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाती युवक हा राहाता तालुक्यातील खडकेवाके गावातील काकांच्या घरी राहत होता. आज्जीला दवाखान्यातून घेऊन खडकेवाके गावात परतत असताना हा अपघात झाला. राहाता पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलिस नाईक वैशाली मोरे करत आहेत.

COMMENTS