Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संसदरत्न खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

बीड । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब व संसदरत्न मा. खा. श्री

आदित्य पॉलीटेक्निकच्या दोन विद्यार्थींची भारतीय नौदलात निवड
श्रीक्षेत्र दत्त मंदिराला जाण्यासाठी पायर्‍यांचे बांधकाम पूर्ण; 9 फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा
आ. सुरेश धस यांना फेसबुक पोस्टद्वारे धमकी; कडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

बीड । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब व संसदरत्न मा. खा. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत योगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा राजीव नगर बहिरवाडी बीड येथे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तसेच क्रिकेट, रनिंग, कबड्डी, खो-खो, रांगोळी, निबंध, हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून विजयी खेळाडूंना बक्षीस वितरण कार्यक्रम शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री. मनोजजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  करताना आयोजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख ड. चंद्रकांत नवले यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्ही सदैव शिवसेनेसोबत असून यापूर्वी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असताना संपूर्ण जिल्ह्यात शहरासह गाव, वाडी, वस्ती, तांडा, इत्यादी ठिकाणी जाऊन शिवसेनेचे विचार सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचण्यासाठी गावोगावी शिवसेना शाखा स्थापन करून सामना हे वृत्तपत्र संपूर्ण जिल्हाभर पोहोचविण्याचे कार्य केले बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये शिवसैनिकांचं आणि शिवसेना लोकप्रतिनिधींचा भरीव असं काम आहे मग ते सिंचन, रस्ते बांधकाम, विज , इरिगेशन, पाणीपुरवठा योजना क्रीडा संकुले, आदींसह भरीव काम असल्याचे सांगितले त्याचबरोबर जिल्हाभरातील तीन नगरपालिका चार पंचायत समिती तसेच बीड जिल्हा परिषद सुद्धा शिवसेना आणि मित्र पक्षांकडे होती. तसेच शाळा, महाविद्यालय, झुणका भाकर केंद्र विविध शैक्षणिक संस्था अठरापगड समाजातील कार्यकर्त्यांना मिळवून देवून शासकीय ठेकेदारी काय असते हे कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष कामांच्या वर्क ऑर्डर देऊन शिकविले असल्याचे सांगितले. तसेच या आठवड्यामध्ये जिल्हा रुग्णालय बीड व उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे कर्करोग मुक्त बीड जिल्हा असे अजिंक्य मुळे आणि जिल्हा शिवसेना मिळून दोन कार्यक्रम घेतले यासाठी मुंबईवरून तज्ञ डॉक्टर बोलावले होते. येत्या नऊ तारखेला गेवराई येथील रुग्णालयामध्ये व शिवसेनेच्या शहर शाखेमध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे तसेच शिवसेना पदाधिकारी आपल्या विभागांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. मनोजजी शिंदे साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय दिघे साहेबांना स्मरण करून भाषणाला सुरुवात केली यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अनिल दादा जगताप व  शिवसेना जिल्हाप्रमुख ड. चंद्रकांत आप्पा नवले यांचे भरभरून कौतुक केले हा कार्यक्रम तर मी संमती दिली आणि लगेच काही तासातच यशस्वीरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच त्यांच्या अनुभवाची आणि कार्यकुशीलतेची प्रशंसा करत मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब हे नेहमी सांगत असतात या समाजामध्ये काम करत असताना बाळासाहेबांनी दिलेले विचार आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी दिलेली शिकवण यामध्ये 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण. आता मी वेळोवेळी सगळीकडे फिरत असतो मी शहरांमध्ये शाळा पाहिलेले आहेत परंतु खेड्यापाड्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये शाळा चालवणं पाहिजे एवढं सोपं नाहीये परंतु चंद्रकांत नवले यांचे मी कौतुक करतो की त्यांनी ग्रामीण भागामध्ये एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही असा मला दृढविश्वास वाटतो. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागाला जास्त महत्त्व देतो. मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर साजरा होतो आहे. हा वाढदिवस साजरा करत असताना सर्व विद्यार्थी उत्साही आणि आनंदात दिसत आहेत. संस्थेचे अध्यक्ष ड. चंद्रकांत नवले यांची सुद्धा तळमळ आणि उत्साह पाहून मला पण फार आनंद झाला. चंद्रकांत नवले यांना असं वाटत होतं की आज आपल्या शाळेवर स्वतः साहेब येत आहेत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी येतायेत महिला पदाधिकारी येत आहेत सर्व मान्यवर येत आहेत आणि माझ्या मुलांचं आज खर्‍या अर्थाने कौतुक होणार आहे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणार आहे अशी मानसिकता असणारा नेता सुद्धा समाजामध्ये असणं गरजेचं आहे आणि असा नेता मला चंद्रकांत आप्पा मध्ये दिसला. म्हणून त्यांना जो आनंद त्यांच्या चेहर्‍यावर जो मी आनंद पाहिला त्यामुळे मला पण एक समाधान वाटलं. मला सर्व जिल्हाप्रमुखांचा अभिमान वाटतो. बीड जिल्हा काही पक्षाच्या माध्यमातून विस्कळीत झालेला आहे. त्याची सुटका करण्याची जबाबदारी करण्याची आपणाकडे आणि सर्व पदाधिकारी यांच्याकडे आहे. तसं पाहिलं तर पत्रकार हे राजकारणामध्ये कधी सहभाग घेत नाहीत परंतु मी पाहिलं या दोन्ही कार्यक्रमांमध्ये  पत्रकार मंडळी मोठ्या ताकदीने शिवसेनेच्या मागे उभा आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आणि कौतुक वाटते. असा कार्यक्रम क्वचितच लोक साजरा करतात जो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. या दोन्ही कार्यक्रमांचे फोटो आणि ते मी पदाधिकार्‍यांना मागितले ते यासाठी मागितले की एकनाथरावजी शिंदे साहेब लाडक्या बहिणीसाठी गोरगरिबांसाठी कष्टकर्‍यांसाठी जे श्रम करत आहेत 18-18 तास काम करत आहेत ते काय वाया गेलेले नाही तुमचा वाढदिवस हा विद्यार्थी छोटे छोटे विद्यार्थी विद्यार्थीनी ऊन असून सुद्धा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहेत तुमचे श्रम आणि परिश्रम कधीही वाया जाणार नाहीत गेले नाहीत हे आज मी प्रत्यक्ष या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज शाळेवर आल्यानंतर मला दिसलं.  यापूर्वी अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु शिंदे साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे जे नेहमी एसी रूम मध्ये न बसता सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून रस्त्यावरच जास्त दिसतात. कोणाचा एक्सीडेंट झाला तर ते स्वतःची गाडी त्याला देतात. आज शिंदे साहेब जरी उपमुख्यमंत्री दिसत असले किंवा ते मुख्यमंत्री जरी होते तरी ते काय त्यांचा प्रवास एवढा काही साधा आणि सोपा नव्हता एक शिवसैनिक, शिवसेना शाखाप्रमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री हे काय सोपी गोष्ट नव्हती दिवस-रात्र आणि हाडांची काढ त्यांनी केली जनतेसाठी जनतेचा आणि सर्व महाराष्ट्राचा विश्वास त्यांच्यावरती आहे जेव्हा पहलगामला हमला झाला त्यावेळी स्वतः शिंदे साहेबांनी जाऊन तिथे पिडीत मराठी बांधवांना मदत केली त्यांचं सांत्वन केलं आणि जे बचावले होते त्यांना घेऊन येण्याचं काम सुद्धा माननीय साहेबांनी केले गरिबाच्या मागे ताकतीने उभा राहण्याचं काम मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब करत असतात. असा नेता या भारत वर्षामध्ये मला तरी वाटतं झाला नसेल एवढं मोठं नेतृत्व आपल्याला मिळालेला आहे. मला तुम्हा सर्व जिल्हाप्रमुखांचा सार्थ अभिमान वाटतो आणि एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब हे सुद्धा बीड जिल्ह्यातील शिवसैनिकावर तेवढेच प्रेम करतात त्यांची त्यांचं बीड जिल्ह्याकडे तेवढेच लक्ष आहे हे सुद्धा मी जाणतो डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचं संसदेमध्ये उल्लेखनीय कार्य त्यांना संसदरत्न ते आहेत परंतु ज्यावेळेस मंत्रीपद देण्याचा प्रसंग आला त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मुलाला न देता अन्य शिवसेनेतील नेत्यांना मंत्रीपद दिले अशा प्रकारचे नेतृत्व सर्व मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याला लाभलेले आहेत हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे सुदैव आहे. शिवसेनेमध्ये जो काम करेल तोच पक्षाचा राजा आहे अशा प्रकारचे विचार घेऊन चालणारा हा नेता आहे मला या ठिकाणी मनस्वी आनंद झाला कारण की लोक वाढदिवस साजरा करतात जेवण देतात पार्टी करतात धांगडधिंगा करतात परंतु अशा प्रकारचा वाढदिवस आपण साजरा केला त्याबद्दल मी शिंदे साहेबांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि सामाजिक काम करत चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यापैकी काम म्हणजे आज विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी गणेश वाटप तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वितरण कार्यक्रम घेतला त्याबद्दल समाधान व्यक्त करून केलेल्या उपक्रमांची माहिती मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक, शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैया गलधर, छावाचे जिल्हाध्यक्ष अशोक अण्णा रोमन, गिरीश करवा, पप्पू  शिंदे, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संगीता ताई चव्हाण, शिवसेनेच्या फरजाना शेख, गेवराई शहर प्रमुख मुकेश महाजन, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख ड. बापूसाहेब जाधव, शिवसेना नेते सुनील सुरवसे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोषजी किसनराव जाधव, बीड शहर प्रमुख गजानन कदम, जिल्हा सचिव सुनील भाऊ अनुभुले शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण शिंदे, शिवसेना नेते विक्रमराजे भोसले, तगछढ तालुकाप्रमुख बाळासाहेब खेडकर, नगरपरिषद बीड बांधकाम सभापती संजय भाऊ उडान, नगरसेविका शितलताई चक्रे, नगरसेवक सुरज चुंगडे, नगरसेवक मनोज गोडसे, नगरसेवक जैतुल्ला खान, माजी सभापती अमोल पौळ, संजय गोडसे, बापू जाधव, संपादक वैभवजी स्वामी, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, संस्थेचे सचिव विश्वनाथ उर्फ राजेंद्र गुप्ते,पोपट घाडगे, भागवत बादाडे, सचिन पाटील कुर्ला, रुस्तुम बेद्रे, गणेश जाधव, बालाजी गायकवाड, अबू उपळकर,  योगेश कुंभारकर,सिराज पठाण, खान साहेब, प्रा. सचिन उबाळे, योगेश नवले, सचिन टेकाळे, शेतकरी सेनेचे संदीप सोनवणे, राजेश दादा नवले, सेजलताई नवले, संजय नाना नवले, मुक्ताराम आहेर, प्रकाश नरनाळे, गणेश पवार, बिबीशन मोघे, उमेश शिंदे, शिवराज उगले, स्वप्निल आबूज सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS