बीड । प्रतिनिधी गणेश भालचंद्र माने विद्युत सहाय्यक रा. आष्टी याने दिनांक 07/05/2024 रोजी आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की दि. 07/05/2024 रोजी दुपार
बीड । प्रतिनिधी
गणेश भालचंद्र माने विद्युत सहाय्यक रा. आष्टी याने दिनांक 07/05/2024 रोजी आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की दि. 07/05/2024 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चडएऊउङ आष्टी येथील कार्यालयामध्ये असताना व तो शासकीय काम करत असताना आरोपी रोहित राजेंद्र वांढरे रा. पांढरी ता. आष्टी याने बेकायदेशीर विज जोडून देण्यासाठी दबाव निर्माण केला व वीज जोडणी करण्यास नकार दिल्याने आरोपी ह्याने महावितरणच्या कार्यालयामध्ये येऊन मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
अशा प्रकारची तक्रार दिलेली होती या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गु.र.नं. 207/2024 कलम 353,323,504,506 भा.द.वी गुन्हाचे आष्टी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती. सदरील प्रकरण हे बीड येथील 3 रे अति. सत्र न्यायालयात चालले असता मा. न्यायालयाने आरोपीची दि. 31/01/2026 रोजी मुक्तता करण्यात आली. सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले होते. सदरील प्रकरणात मा. न्यायालयाने नोंदविले की प्रकरणात कोणत्याही स्वतंत्र साक्षीदाराचे जबाब नोंदविले नाहीत व सरकार पक्षाने त्याची केस सिद्ध केली नाही म्हणून आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदरील प्रकरणात आरोपीतर्फे अॅड एन.एन. साबळे यांनी काम पाहिले व त्यांना अॅड आर.एन. साबळे, अॅड. एस.आर.आपरे व अॅड. जी. व्ही. पवार यांनी सहकार्य केले.

COMMENTS