Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नामांकित हॉटेलमध्ये बसून दिली क्लास वन अधिकाऱ्याची परीक्षा

मुंबई प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तलाठी परीक्षेपासून ते राज्य सेवा प

अपघातात दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू
लाच प्रकरणात सहायक पोलिस आयुक्त अडचणीत
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्य तेलाच्या किमतीत घट

मुंबई प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तलाठी परीक्षेपासून ते राज्य सेवा परीक्षेपर्यंत पेपर रॅकेट कार्यरत असून काही लाखांमध्ये पेपर मिळवून ते सोडवले जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशातच आता केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेतही मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये बसून विद्यार्थी याची परीक्षा देत असल्याचे समोर आलं आहे.

क्लास वन अधिकारी पदाची परीक्षा काही विद्यार्थ्यांनी मुंबईच्या एका नामांकित हॉटेलमध्ये बसून दिल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. मरिन  विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या  मरिन इंजिनीअरिंग ऑफिसर या क्लास वन अधिकाऱ्याच्या परीक्षेत हा घोटाळा करण्यात आला आहे. या परिक्षेच्या  उत्तर पत्रिकेसाठी एका विद्यार्थ्याने तब्बल साडेआठ रुपये भरले होते. त्यानंतर एका नामांकित हॉटेलमध्ये बसून हा विद्यार्थी परीक्षा देत होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने परीक्षा केंद्रातून या उत्तर पत्रिका बाहेर पोहोचवण्यात येत असल्याचे समोर आलं आहे. मरीन विभागाला याप्रकरणी संशय आल्यानंतर त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. मर्केंटाईल मरिन विभाग इंजिनीअर ॲण्ड शिप सर्व्हेअर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल या पदावर कार्यरत असलेले पूर्णाचंद्र विजयकुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार, एमआरए मार्ग पोलिसांनी 22 विद्यार्थ्यांसह 27 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

COMMENTS