अकोले : ब्लास्टिंगच्याच्या स्फोटात उडालेला दगड डोक्यात पडून कोपरगाव तालुक्यातील एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पांगरी येथे घडली. या घटनेत मृत झाल
अकोले : ब्लास्टिंगच्याच्या स्फोटात उडालेला दगड डोक्यात पडून कोपरगाव तालुक्यातील एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पांगरी येथे घडली. या घटनेत मृत झालेल्या कामगाराचे नाव नितीन धोंडीराव थोरात (वय 37 वर्ष रा.रांजणगाव ता. कोपरगाव) असून शनिवारी दुपारी ही घटना घडली.
पांगरी शिवारातील त्र्यंबक दगडू काळे यांनी आपले बंधू सुकदेव डोंगरे यांचे शेतात विहीर खोदण्याचे काम राहुरी तालुक्यातील आढाव नावाच्या ठेकेदाराला दिले होते. खोदकाम करत असताना दुपारी ब्लास्टिंगचा स्फोट घडून आणला. यावेळी स्फोटाच्या दणक्याने दूरवर थांबलेल्या कामगाराच्या डोक्यात दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कामगाराला कोतुळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला. अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली
दरम्यान अकोले तालुक्यात स्टोन क्रेशर च्या दगड खाणी, गौण खनिज उत्खनन,विहिरींचे खोदकामासाठी लागणार्या जिलेटीन साहित्याचे मोठे साठे बेकायदेशीरपणे तालुक्यात ठीक ठिकाणी साठवलेली आहे. अनेक व्यावसायिक या व्यवसायामध्ये पुढे आलेले असून कोणत्याही नियमाचे पालन न करता दिवसा व रात्री कधीही जिलेटिन स्फोटके उडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

COMMENTS