१,२७० कोटींची ऊस बिले वेळेत अदा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा श्रीगोंदा : ओंकार शुगर ग्रुपने गळीत हंगाम २०२५–२६ मध्ये शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवत उ

१,२७० कोटींची ऊस बिले वेळेत अदा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
श्रीगोंदा : ओंकार शुगर ग्रुपने गळीत हंगाम २०२५–२६ मध्ये शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या हंगामात ग्रुपच्या सर्व साखर कारखान्यांमार्फत एकूण ५० लाख मेट्रिक टन ऊस गाळप यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, यामुळे परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या गाळपासाठी शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या ऊसापोटी ओंकार शुगर ग्रुपने सर्व युनिट्समार्फत एकूण १,२७० कोटी रुपयांची ऊस बिले वेळेत व पूर्णपणे अदा केली आहेत. सर्वोच्च ऊस दर, काट्यावर अचूक वजन आणि वेळेवर ऊस बिल ही ओंकार शुगर ग्रुपची ओळख असून, ही परंपरा याही हंगामात कृतीतून सिद्ध झाली आहे.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी यापूर्वीच स्पष्टपणे मांडले होते की, “शेतकरी जगला पाहिजे. शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे.” कुठेही वजन करा, ऊस घेऊन या — काटा अचूक राहील, शेतकऱ्याला सर्वोच्च दर दिला जाईल आणि ऊस बिल वेळेत मिळेल, ही त्यांची ठाम भूमिका गळीत हंगाम २०२५–२६ मध्ये केवळ शब्दांत नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून दिसून आली आहे.
ओंकार शुगर ग्रुपच्या विविध युनिट्समध्ये आधुनिक यंत्रसामग्री, पारदर्शक प्रशासन आणि नियोजनबद्ध गाळप प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला गेला. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही आणि त्यांचे उत्पन्न सुरक्षित राहिले. “शेतकऱ्यांचा ऊस ही आमची जबाबदारी आहे” या भावनेतून ग्रुपने संपूर्ण हंगामात कामकाज केल्याचे दिसून आले.
या माध्यमातून केवळ साखर उत्पादनच नव्हे तर शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे. भविष्यातही “शेतकरी केंद्रबिंदू” ही भूमिका कायम ठेवत, ओंकार शुगर ग्रुप शेतकरी हित, ग्रामीण विकास आणि विश्वासार्ह उद्योग समूह म्हणून आपली वाटचाल सातत्याने पुढे नेत राहील, असा ठाम विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

COMMENTS