Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले भाजी मंडईतील भाजी बाजार पुन्हा रस्त्यावर

शेवगामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर;  समस्या चिघळण्याची शक्यता शेवगाव :  शहरातील नवीन बाजारात स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले भाजी मंडईतील भाजीपाला विक्रेत्यांनी (ओटा धारकांनी) पुन्हा एकदा मंडईच्या समोरील जुन्या जागांवर आपले ओटे थाटल्याने शहरातील बाजारव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळे आधीच अतिक्रमणाने ग्रासलेल्या नवीन बाजार तळामध्ये पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.  महात्मा फुले भाजी मंडईत भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असतानाही अनेक ओटा धारकांनी मंडईच्या आत बसणे परवडत नसल्याचे कारण पुढे केले आहे. “आत बसल्यास जास्त भाडे द्यावे लागते, तसेच आमच्या दुकानासमोर इतर दुकाने लागतात, त्यामुळे ग्राहक येत नाहीत,” अशी विविध कारणे देत या विक्रेत्यांनी आपले ओटे पुन्हा बाहेर रस्त्यालगत थाटले आहेत. परिणामी मोकळ्या जागांवर अतिक्रमण वाढत असून वाहतूक व नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर त्याचा परिणाम होत आहे.या संदर्भात बाजार समिती प्रशासनाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नगरपरिषदेने तातडीने हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवावे व भाजी मंडईतील विक्रेत्यांची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. अन्यथा हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “ओटा धारकांची योग्य व व्यवस्थित सोय नगरपरिषदेला करता येत नसेल, तर नगरपरिषदेने तत्काळ त्यांची अमानत रक्कम परत द्यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल,”   – शेख प्यारेलाल, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी “संबंधित ओटा धारकांना अनेक वेळा मंडईच्या बाहेर भाजीची दुकाने थाटू नयेत, असे सांगण्यात आले आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.” –   अवी मातंग, सुरक्षा रक्षक, बाजार समिती 

पोलीस उपायुक्त कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा  : डॉ. दुकळे
विद्यार्थ्यांमधील कलारूपी राजहंस शिक्षकांनी शोधावा : प्रा. चव्हाण

शेवगामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर;  समस्या चिघळण्याची शक्यता

शेवगाव :  शहरातील नवीन बाजारात स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले भाजी मंडईतील भाजीपाला विक्रेत्यांनी (ओटा धारकांनी) पुन्हा एकदा मंडईच्या समोरील जुन्या जागांवर आपले ओटे थाटल्याने शहरातील बाजारव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळे आधीच अतिक्रमणाने ग्रासलेल्या नवीन बाजार तळामध्ये पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 महात्मा फुले भाजी मंडईत भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असतानाही अनेक ओटा धारकांनी मंडईच्या आत बसणे परवडत नसल्याचे कारण पुढे केले आहे. “आत बसल्यास जास्त भाडे द्यावे लागते, तसेच आमच्या दुकानासमोर इतर दुकाने लागतात, त्यामुळे ग्राहक येत नाहीत,” अशी विविध कारणे देत या विक्रेत्यांनी आपले ओटे पुन्हा बाहेर रस्त्यालगत थाटले आहेत. परिणामी मोकळ्या जागांवर अतिक्रमण वाढत असून वाहतूक व नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर त्याचा परिणाम होत आहे.या संदर्भात बाजार समिती प्रशासनाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नगरपरिषदेने तातडीने हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवावे व भाजी मंडईतील विक्रेत्यांची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. अन्यथा हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओटा धारकांची योग्य  व्यवस्थित सोय नगरपरिषदेला करता येत नसेलतर नगरपरिषदेने तत्काळ त्यांची अमानत रक्कम परत द्यावीअन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल,”  

– शेख प्यारेलालतालुकाध्यक्षवंचित बहुजन आघाडी

“संबंधित ओटा धारकांना अनेक वेळा मंडईच्या बाहेर भाजीची दुकाने थाटू नयेत, असे सांगण्यात आले आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.”

–   अवी मातंग, सुरक्षा रक्षक, बाजार समिती 

COMMENTS