Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन

नगर रोडवरील मंदिरात तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल बीड । प्रतिनिधी नगर रोडवरील चर्हाटा फाटा  येथील गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन उत्सव दि.6 ते

Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)
राष्ट्रसंत गाडगे महाराजांची सार्वजनिक 150 वी जयंती भव्यतेने साजरी करण्यासाठी बीडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक
जातीय द्वेषातून अपमानकारक वागणूक देणार्‍या शाळेवर कारवाईची मागणी

नगर रोडवरील मंदिरात तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
बीड । प्रतिनिधी
नगर रोडवरील चर्हाटा फाटा  येथील गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन उत्सव दि.6 ते 8  फेबु्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. येथील मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वरील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील मंदिरात शुक्रवारी दि.6 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रवीणकुमार बांगर, मुरलीधरराव बाणाईत, मेघराज कल्याणराव पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीस अभिषेक, दुपारी 4 ते 5 हभप रामहरी महाराज रसाळ यांच्या सुश्राव्य प्रवचन, संध्याकाळी 5 ते 7  हभप शिवाजी महाराज मिसाळ यांचे अभंग गायन व रात्री 8 ते 10 यावेळेत हभप शिवाजी महाराज मिसाळ यांचे किर्तन, शनिवारी दि.7 रोजी सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर व डॉ. अनिमेष पैठणकर यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीस अभिषेक, दुपारी 4 ते 5 हभप महादेव महाराज डाके यांचे प्रवचन, संध्याकाळी 5 ते 7 हभप प्रतिभाताई करडुले यांचे अभंग गायन, रात्री 8 ते 10 हभप पार्वतीताई महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे किर्तन, रविवारी दि.8 रोजी सकाळी संतोष जगन्नाथराव सोहनी, धनंजय जीवनराव सानप, सतीशराव पत्की यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, सकाळी 10 ते 12 हभप शांतीब्रम्ह गुरूवर्य महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे कीर्तन, दुपारी 12 ते 1 यावेळेत सौ.रजनीताई जोशी, सौ.ज्योती पालीमकर, सौ.स्वातीताई सर्वज्ञ, सौ. स्मिताताई पत्की, सौ. वर्षाताई पत्की यांच्या हस्ते प्रकटोत्सव होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 4 यावेळेत महाप्रसाद होणार आहे. दरम्यान, संपूर्ण कार्यक्रमात गायक हभप नारायण महाराज साळुंके, रामनाथ कोठेकर, मच्छिंद्र गारदे, दादाराव कोठेकर, सुभाष कोठेकर, वैजीनाथराव सानप हे करणार आहेत.

COMMENTS