Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार मध्ये गाईचे वासरू कोंबून नेणारे आरोपी पकडण्यात रामतीर्थ पोलिसांना आले यश

शंकरनगर । प्रतिनिधीनांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या नरसी पोलीस चौकी जवळून एका कार मध्ये गाईच्या वासराला कोंबून नेताना कारला गाईने अडवण्याच

छत्रपती संभाजीनगर येथे ब्राह्मण महाअधिवेशनात नांदेडचे नगरसेवक आशिष नेरलकर यांचा सत्कार
नांदेडमध्ये पीएम विश्‍वकर्मा प्रदर्शनीची ‘कलाकुसर’
Nanded : गुरफळीचे दुग्ध व्यावसायिक करतायेत नदीतून प्रवास (Video)

शंकरनगर । प्रतिनिधी
नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या नरसी पोलीस चौकी जवळून एका कार मध्ये गाईच्या वासराला कोंबून नेताना कारला गाईने अडवण्याचा केलेला प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या घटनेची रामतीर्थ पोलिसांनी नोंद घेत आरोपीचा शोध घेतला असता अवघ्या चार दिवसात आरोपींना पकडून गुन्ह्याची उकल करण्यात रामतीर्थ पोलिसांना यश आले.  
अधिक माहिती अशी की  दिनांक 25/01/2026 रोजी सकाळी 05:22 वा  नरसी ते बिलोली जाणार्‍या रोडवर मध्यवर्ती बँकेच्या समोर रोडच्या दुभाजकावर बसलेली गाय आणि  वासरू कारमध्ये टाकून  तस्करी केली सदर गाईचे वासराची सुटका करून घेण्याकरिता अत्यंत हिमतीने कार अडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले होते . त्यावरून पोलीस स्टेशन रामतीर्थ  तेथे गुन्हा रजिस्टर नंबर 10/2026 कलम 303 (2) 3(5) भारतीय न्याय संहिता  प्रमाणे गुन्हा दाखल असून या घटनेतील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस स्टेशनचे जमादार सोनकांबळे, चालक धूताडे, शिंदे यांनी सदरील गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आले असून सदर गुन्ह्यात गो तस्करी/ चोरी करणारे आरोपी 1)  मोहम्मद अजीम मोहम्मद सिराज राहणार नांदेड.2) शेख आश्रम पिताशकेल राहणार मनोर तालुका जिल्हा पालघर मनोर तालुका जिल्हा पालघर 3) आयुब खान राहणार मुंब्रा जिल्हा ठाणे यांना  रामतीर्थ पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील गायीच्या वासराला चोरून नेण्यासाठी वापरण्यात आलेलली वाहन दणत हि कार क्रमांक चक46 झ 8481 ही गाडी सुद्धा जप्त केलेली आहे  सदर आरोपी हे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रामतीर्थ पोलीस ठाण्यात अटक करून त्यांच्याकडील वाहन जप्त करण्यात आले असून पुढील तपास सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. एका कार मध्ये गाईचे वासरू चोरून नेले ही घटना सोशल मीडिया वरून व्हायरल होताच बजरंग दलाचे कार्यकर्ते पांडुरंग खानपट्टे कैलास बनकर नागेश मोर्चे प्रवीण भाऊ पाळेकर दीपक भाऊ तळणीकर सतीश आदींने गाईच्या वासराची क्रूरपणे कार मध्ये वाहतूक करणारे आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लावून धरली असता रामतीर्थ पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे.

COMMENTS