शेवगाव : प्रत्येक विद्यार्थ्यांना आपले आई वडिल कष्ट करून शिक्षण देतात. एक सुजान नागरिक बनावे यासाठी प्रयत्न करत असतात. पण सध्या युवकांमध्ये व्यसना

शेवगाव : प्रत्येक विद्यार्थ्यांना आपले आई वडिल कष्ट करून शिक्षण देतात. एक सुजान नागरिक बनावे यासाठी प्रयत्न करत असतात. पण सध्या युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त आढळून येते. त्यास विद्यार्थ्यांनी बळी न जाता मार्गक्रमण करावे. विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क, अधिकार आहे. विद्यार्थी हा देशाची युवा शक्ती आहे. महाविद्यालयीन जीवन जगत असताना विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव मिळतो. त्या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी अष्टपैलू होण्याचा प्रयत्न करावा असे सांगून शेवगाव येथील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ते शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील आयोजित विविध गुणदर्शन समारंभात बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाली. या कार्यक्रमात प्रथम गणेश वंदना झाली या कार्यक्रमात एकूण ४० विविध कला गुणांचे कार्यक्रम सादर झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, भाऊसाहेब अडसरे, सांस्कृतिक प्रमुख डॉ. गोकुळ मुंढे, कार्याध्यक्ष प्रा. अनिल काळे, डॉ. रवींद्र वैद्य, डॉ. गोकुळ क्षीरसागर, प्रा. आशा वडणे, प्रा. मिनाक्षी चक्रे, प्रा. कल्याणी बहिरट, प्रा. सुशीलकुमार शिंदे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गहिनीनाथ शेळके आणि प्रा. मोहिनी जाधव यांनी केले तर आभार डॉ. गोकुळ मुंढे यांनी केले.

COMMENTS