मुंबई : मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर ठरला आहे. दोन दिवसांनंतर म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जा

मुंबई : मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर ठरला आहे. दोन दिवसांनंतर म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 11 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार आहे, यासाठी ठाकरे गट उमेदवार देण्याची शक्यता असून तशी हालचाल मातोश्रीवर गुरूवारी सुरू होती.
11 फेब्रुवारी रोजीच दुपारी 12 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या 15 मिनिटे आधी असणार आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गट सुद्धा महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ जास्त असताना सुद्धा शिवसेना ठाकरे गट सुद्धा महापौर उपमहापौर पदाचा उमेदवार देण्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारीला शिवसेना ठाकरे गट महापौर उपमहापौर पदाचा उमेदवाराचा अर्ज भरणार का? याकडे लक्ष असणार आहे, या सगळ्या संदर्भात गटनेता किशोरी पेडणेकर व इतर काही अनुभवी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. संख्याबळ नसलं तरी महापौर उपमहापौर पदाचा अर्ज भरण्याचा ठाकरेच्या शिवसेनेचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे.

COMMENTS