Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूर तालुक्यातील नागरिकांनी जनता दरबारात तक्रारी मांडाव्यात -आ.केराम

माहूर । प्रतिनिधीकिनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आ. भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 फेब्रुवारी रोजी माहूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्

श्री रेणुका देवी संस्थानला एका महिन्यात 1 कोटी 14 लाखांहून अधिकचे विक्रमी उत्पन्न
केसुला बहुउद्देशीय संस्थेतर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
एस. एस. पाटील यांची ‘बालभारती’ पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर निवड

माहूर । प्रतिनिधी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आ. भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 फेब्रुवारी रोजी माहूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या जनउपयोगी योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो आहे का, याची तपासणी करण्यात येणार असून, कामात अडवणूक करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. तहसील, पंचायत समिती, शिक्षण, महावितरण, कृषी, नगर पंचायत, सार्वजनिक बांधकाम, वन, आरोग्य व पाणीपुरवठा विभागांचे अधिकारी जनता दरबारात उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारींची लेखी निवेदने 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत संबंधित पदाधिकार्‍यांकडे सादर करावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS