Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिलोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक; 16.68 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 आरोपी अटकेत

नांदेड । प्रतिनिधी अवैध व्यवसायांविरोधात कठोर भूमिका घेणार्‍या नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत बिलोली तालुक्यात सुरू असलेल्या जु

मुदखेडमध्ये वाळू माफियांचा उच्छाद: गोदावरीच्या पात्रात ’सक्शन मशीन’द्वारे अवैध उपसा, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष?
मराठवाड्यातील सहकारी दूध संस्थांसोबत भागीदारीचा निर्णय ‘अमूल’ने घ्यावा; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
24 वर्षांनंतरही मैत्रीची नाळ तुटली नाही; गुजराती हायस्कूलच्या 2003 च्या दहावीच्या बॅचचे ‘उमंग’ स्नेहसंमेलन उत्साहात

नांदेड । प्रतिनिधी
अवैध व्यवसायांविरोधात कठोर भूमिका घेणार्‍या नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत बिलोली तालुक्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत 3 लाख 6 हजार रुपयांची रोख रक्कम व एकूण 16 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बिलोलीजवळील सावळी रोड परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड व त्यांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई आखली. दि. 2 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अंधाराचा फायदा घेत काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र पोलिसांनी पाच मुख्य आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेतले. छाप्यात जुगारासाठी वापरण्यात आलेली साधने तसेच वाहने मोठ्या प्रमाणात आढळून आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 3 लाख6, हजार रुपये रोख रक्कम, एक कार, एक ऑटो रिक्षा, तेरा मोटारसायकली व पाच मोबाईल फोन असा एकूण 16 लाख 68, हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, या जुगार अड्ड्यावर केवळ स्थानिकच नव्हे तर शेजारच्या तेलंगणा राज्यातूनही जुगारी मोठ्या संख्येने येत होते. त्यामुळे ही कारवाई आंतरराज्यीय पातळीवरील अवैध धंद्यांना आळा घालणारी ठरणार आहे. अवैध व्यवसायांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणार्‍या पोलिस प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनी देखील अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांची माहिती 91 50 100 100 या हेल्पलाईनवर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS