Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री क्षेत्र मढी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी मरकड

पाथर्डी : भटक्यांची पंढरी म्हणून देशभरात नाव लौकिक असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील श्री कान्होवा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विठ्

चौरंगीनाथ खाजगी कृषी बाजारच्या वतीने नवीन अनुज्ञाप्ती देणे सुरूः शेख
अतिवृष्टीची नुकसानभरपाई रखडली; नागरिकांत संताप
बैलबाजार रस्त्याचे रखडलेले काम १ मे पर्यंत चालु करा अन्यथा आंदोलन करणार : कुरेशी

पाथर्डी : भटक्यांची पंढरी म्हणून देशभरात नाव लौकिक असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील श्री कान्होवा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विठ्ठल राधाकिसन मरकड यांची, तर उपाध्यक्षपदी सुरसिंगराव पवार यांची निवड करण्यात आली. देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाची पहिली अधिकृत बैठक रविवारी कानिफनाथ गडावर पार पडली. यावेळी सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

 मढी देवस्थानच्या अकरा विश्वस्तांची २० जानेवारी २०२६ रोजी निवड धर्मादायुक्तांकडून झाली. हे विश्वस्त मंडळ  २० जानेवारी २०२६ ते १९ जानेवारी २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आले असून, त्यानंतर विश्वस्त मंडळातून पदाधिकारी निवडीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत ट्रस्टचे विश्वस्त अनिल साठे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली.त्यावर विश्वस्त उत्तम मरकड यांनी विठ्ठल मरकड यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला,जो एकमताने मंजूर झाला.

या बैठकीत अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सरचिटणीस माधुरी गणेश मरकड, चिटणीस अनिल अशोकराव साठे, कोषाध्यक्ष दादासाहेब शिवराम मरकड, तसेच कार्याध्यक्षपदी महादेव कोकाटे यांची निवड करण्यात आली. याशिवाय उत्तमराव शंकर मरकड, अ‍ॅड. तानाजी धोंडीराम उर्फ रामचंद्र धसाळ, तानाजी हिरामन शिंदे, मदन विष्णू मरकड व उषा संतोष मरकड हे विश्वस्त म्हणून कार्यरत राहणार आहेत.

दरम्यान, देवस्थानच्या विकासासाठी माजी विश्वस्त मंडळाला वेळोवेळी मार्गदर्शन करून शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांचे नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाने आभार मानले. भविष्यातही देवस्थानच्या विकासासाठी आमदार राजळे यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS