जायभायवाडी ग्रामपंचायतमधील प्रकार ; चौकशीचे आदेश जामखेड : तालुक्यातील जायभायवाडी ग्रामपंचायतमध्ये बोगस ग्रामसभा दाखवून ग्राम रोजगार सेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मोठा गैरव्यवहार करत प्रशासन व ग्रामस्थांची फसवणूक झाली असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी संबधितांना नोटीसा बजावल्या आहेत. प्रत्यक्षात ग्रामसभा न घेता ग्रामविकास अधिकारी सरपंच व काही सदस्यांनी संगनमत करून केलेल्या फसवणुकीची तक्रार जायभायवाडी ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी एम.पी. इसरवाडे यांनी गावात जाऊन नागरिकांशी संवाद करत चौकशी केली. तसेच ग्रामपंचायत दप्तर तपासले. त्याठिकाणी २०/०३/२०२५ रोजी बोगस ग्रामसभा घेतल्याचे विस्तार अधिकाऱ्याना निदर्शनास आले. तसेच काही गंभीर बाबी म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने जुना ग्रामरोजगार सेवकाची नेमणुका रद्द करून नवीन ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक करणेकामी विशेष ग्रामसभा बोलविली होती. त्याविषयी पंचायत ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी कळवले नाही. ग्रामसभेला पंचायत समितीचे कोणतेच अधिकारी उपस्थितीत नव्हते. ग्रामसभा हजेरी रजिस्टरला १०७ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. मात्र सूचक अनुमोदक म्हणून पोपट शामराव उगलमुगले यांची सूचक अनुमोदक म्हणून नोंद आढळून येत आहे. परंतु ते सदर सभेला उपस्थित नव्हते तसेच रजिस्टरला सही नाही. जर ते सूचक अनुमोदक असतील तर त्यांचे ग्रामसभा हजेरी रजिस्टरला सही घेतलेली नाही याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांचेवर निश्चित करण्यात आली आहे. विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार तत्कालीन ग्राम पंचायत अधिकारी राजेद्र बन्सी वळेकर व सरपंच यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. तसेच सदर प्रकरणाची चौकशीचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी २९/०१/२०२६ रोजी आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे सुचक अनुमोदन म्हणून नाव असलेले पोपट उगलभुगले यांच्या पत्नी सुशिला पोपट उगलभुगले या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची चौकशी व्हावी. तसेच खोटा ठराव घेऊन नेमणूक करण्यात आलेल्या ग्राम रोजगार सेवकाची नेमणूक रद्द करण्यात यावी. दप्तरी खोट्या नोंदी केल्यामुळे तत्कालीन ग्राम विकास अधिकारी, सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जायभायवाडी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याचा ‘असा’ही प्रताप सदर प्रकरणातील तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याने असाच खोटा ठराव घेऊन हयात असलेल्या व्यक्तीला मयत दाखवून घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रताप केला आहे. त्याबाबत दोषी आढळून चौकशीला सामोरे जावे लागले आहे. तसेच याच ग्रामविकास अधिकऱ्यानी एका जागेसाठी दोन व्यक्तींना ग्रामरोजगार सेवक म्हणून नेमणूक पत्र दिले होते. असे अनेक प्रताप केल्याची ग्रामस्थांमधून चर्चा आहे.
जायभायवाडी ग्रामपंचायतमधील प्रकार ; चौकशीचे आदेश
जामखेड : तालुक्यातील जायभायवाडी ग्रामपंचायतमध्ये बोगस ग्रामसभा दाखवून ग्राम रोजगार सेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मोठा गैरव्यवहार करत प्रशासन व ग्रामस्थांची फसवणूक झाली असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी संबधितांना नोटीसा बजावल्या आहेत. प्रत्यक्षात ग्रामसभा न घेता ग्रामविकास अधिकारी सरपंच व काही सदस्यांनी संगनमत करून केलेल्या फसवणुकीची तक्रार जायभायवाडी ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी एम.पी. इसरवाडे यांनी गावात जाऊन नागरिकांशी संवाद करत चौकशी केली. तसेच ग्रामपंचायत दप्तर तपासले. त्याठिकाणी २०/०३/२०२५ रोजी बोगस ग्रामसभा घेतल्याचे विस्तार अधिकाऱ्याना निदर्शनास आले.
तसेच काही गंभीर बाबी म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने जुना ग्रामरोजगार सेवकाची नेमणुका रद्द करून नवीन ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक करणेकामी विशेष ग्रामसभा बोलविली होती. त्याविषयी पंचायत ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी कळवले नाही. ग्रामसभेला पंचायत समितीचे कोणतेच अधिकारी उपस्थितीत नव्हते. ग्रामसभा हजेरी रजिस्टरला १०७ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. मात्र सूचक अनुमोदक म्हणून पोपट शामराव उगलमुगले यांची सूचक अनुमोदक म्हणून नोंद आढळून येत आहे. परंतु ते सदर सभेला उपस्थित नव्हते तसेच रजिस्टरला सही नाही. जर ते सूचक अनुमोदक असतील तर त्यांचे ग्रामसभा हजेरी रजिस्टरला सही घेतलेली नाही याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांचेवर निश्चित करण्यात आली आहे. विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार तत्कालीन ग्राम पंचायत अधिकारी राजेद्र बन्सी वळेकर व सरपंच यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. तसेच सदर प्रकरणाची चौकशीचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी २९/०१/२०२६ रोजी आदेश जारी केले आहेत.
विशेष म्हणजे सुचक अनुमोदन म्हणून नाव असलेले पोपट उगलभुगले यांच्या पत्नी सुशिला पोपट उगलभुगले या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत.
ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची चौकशी व्हावी. तसेच खोटा ठराव घेऊन नेमणूक करण्यात आलेल्या ग्राम रोजगार सेवकाची नेमणूक रद्द करण्यात यावी. दप्तरी खोट्या नोंदी केल्यामुळे तत्कालीन ग्राम विकास अधिकारी, सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जायभायवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्याचा ‘असा’ही प्रताप
सदर प्रकरणातील तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याने असाच खोटा ठराव घेऊन हयात असलेल्या व्यक्तीला मयत दाखवून घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रताप केला आहे. त्याबाबत दोषी आढळून चौकशीला सामोरे जावे लागले आहे. तसेच याच ग्रामविकास अधिकऱ्यानी एका जागेसाठी दोन व्यक्तींना ग्रामरोजगार सेवक म्हणून नेमणूक पत्र दिले होते. असे अनेक प्रताप केल्याची ग्रामस्थांमधून चर्चा आहे.

COMMENTS