Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौंदाळा ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय; दररोज सकाळी गावामध्ये राष्ट्रगीत लागणार !

Oplus_131072 भातकुडगाव फाटा : सौंदाळा ग्रामपंचायतीने गावाच्या दैनंदिन जीवनात देशभक्तीची भावना अधिक ठळकपणे रुजवणारा अभिनव निर्णय घेतला आहे. दररोज सक

पत्रकारांना नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्यांना संविधान मान्य आहे की नाही ? lLokNews24
दूधगंगा गैरव्यवहार प्रकरणी व्यवस्थापक अटकेत
सदगुरु कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा उत्साहात
Oplus_131072

भातकुडगाव फाटा : सौंदाळा ग्रामपंचायतीने गावाच्या दैनंदिन जीवनात देशभक्तीची भावना अधिक ठळकपणे रुजवणारा अभिनव निर्णय घेतला आहे. दररोज सकाळी ठीक दहा वाजता गावात लाऊडस्पीकरवर राष्ट्रगीत प्रसारित केले जाणार असून, त्या वेळी सर्व नागरिकांनी उभे राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 समाजहिताचे प्रयोग राबविण्यात सौंदाळा गावाची ओळख यापूर्वीच निर्माण झाली आहे. शिवीगाळ केल्यास दंडाची तरतूद करणारा निर्णय असो वा शिस्तीवर भर देणारे उपक्रम—गावाने नेहमीच वेगळी वाट धरली आहे. त्याच मालिकेत राष्ट्रगीताचा हा निर्णय ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराला कृतीत उतरवणारा ठरत आहे.

 या उपक्रमामागे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र येण्याची भावना बळकट करण्याचा उद्देश असल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले आहे. दररोज राष्ट्रगीताच्या सन्मानातून नागरिकांमध्ये देशप्रेमाची जाणीव दृढ होईल, तसेच लहान मुलांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजतील, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आली आहे. देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे मत सदस्यांनी मांडले.

 गावातील शाळांमध्येही राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहून सन्मान करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच मूल्यसंस्कारांची जोड मिळणार असल्याचे शिक्षकांचे मत आहे.

 या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून, सामाजिक समरसता वाढवणारा आणि दैनंदिन जीवनात राष्ट्रप्रेम जागृत करणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे. विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक संस्थांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

COMMENTS