Homeताज्या बातम्यादेश

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर महागला

नवी दिल्ली : ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (ओएमसी) फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या किम

आजचे राशीचक्र मंगळवार,०९ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा (Video)
राज्यातील चित्र बदलण्यासाठी सत्ताबदल गरजेचा
आम्ही ओबीसी उमेदवार देणार…तुम्ही?

नवी दिल्ली : ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (ओएमसी) फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. मात्र, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघराच्या खर्चावर सध्या तरी अतिरिक्त ताण पडणार नाही.
नव्या दरांनुसार व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 49 ते 50 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर 1,691.50 रुपयांवरून वाढून 1,740.50 रुपये झाला आहे. इतर महानगरांमध्येही अशीच वाढ नोंदवण्यात आली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 49.50 रुपयांची वाढ झाली असून, आता तो 1,844.50 रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईत 19 किलो सिलिंडरचा दर 49.50 रुपयांनी वाढून 1,692 रुपये झाला आहे, तर चेन्नईत 50 रुपयांची वाढ करत किंमत 1,899.50 रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची किंमत 853 रुपये असून, कोलकातामध्ये 879 रुपये, मुंबईत 852.50 रुपये, चेन्नईत 868.50 रुपये आहे. लखनऊ, अहमदाबाद, हैदराबाद, वाराणसी आणि पाटणा या शहरांमध्येही घरगुती सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. घरगुती सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल एप्रिल 2025 मध्ये करण्यात आला होता. तज्ज्ञांच्या मते, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किमती, वाहतूक खर्च आणि कररचनेवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या चढउतारांचा थेट परिणाम या दरांवर होत असल्याने, दरमहा पहिल्या तारखेला खर्चाचा आढावा घेऊन नवीन दर जाहीर केले जातात. जानेवारी महिन्यात जागतिक बाजारात गॅसच्या किमती वाढल्यानेच फेब्रुवारीसाठी व्यावसायिक गॅस महागण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS