जात वैधता प्रमाणपत्र काढून देण्याच्या नावाखाली 25 हजारांची लाच स्वीकारताना खाजगी इसम रंगेहाथ जाळ्यातनांदेड । प्रतिनिधीजात वैधता प्रमाणपत्र काढून द

जात वैधता प्रमाणपत्र काढून देण्याच्या नावाखाली 25 हजारांची लाच स्वीकारताना खाजगी इसम रंगेहाथ जाळ्यात
नांदेड । प्रतिनिधी
जात वैधता प्रमाणपत्र काढून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून लाच स्वीकारणार्या खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यशस्वी सापळा कारवाई करत रंगेहाथ कारवाई केली आहे. ही कारवाई दि. 29 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरातील नमस्कार चौक ते मालटेकडी रोडवरील साई झेरॉक्स सेंटर येथे करण्यात आली.
याप्रकरणी तक्रारदार पुरुष, वय 46 वर्षे, यांनी दि. 28 जानेवारी 2026 रोजी ला.प्र.वि. नांदेड कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या दोन्ही मुलींच्या कुणबी मराठा जातीच्या प्रमाणपत्राचे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे फाईल सादर केली होती. या प्रक्रियेदरम्यान साहेबराव नागोराव गुंडीले (वय 51 वर्षे), व्यवसाय झेरॉक्स दुकान चालक, रा. बजरंग कॉलनी, माता गुजरीजी चौक, नांदेड या खाजगी इसमाने आपणास जात वैधता समिती कार्यालयात ओळख व प्रभाव असल्याचे सांगून वैधता प्रमाणपत्र काढून देण्याचे आश्वासन दिले. एका वैधता प्रमाणपत्रासाठी 30 हजार रुपये आणि दोन प्रमाणपत्रांसाठी 50 हजार रुपये लाच द्यावी लागेल अशी मागणी आरोपीने केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारीच्या अनुषंगाने ला.प्र.वि. नांदेड पथकाने दि. 29 जानेवारी 2026 रोजी पडताळणी कारवाई केली. पडताळणी दरम्यान आरोपीने पुन्हा एकदा आपणास जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात चांगली ओळख असल्याचे सांगून एका वैधता प्रमाणपत्रासाठी तडजोडीअंती 25 हजार रुपये लाचेची मागणी शासकीय पंचासमक्ष केली. मागणीची खात्री झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. नियोजित सापळ्यानुसार दि. 29 जानेवारी 2026 रोजी तक्रारदार आरोपीच्या साई झेरॉक्स सेंटर येथे गेले असता, आरोपीने शासकीय पंचासमक्ष तक्रारदाराकडून 25 हजार रुपये लाचेची रक्कम स्वतःसाठी स्वीकारली. त्यावेळी ला.प्र.वि. पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीस रंगेहाथ पकडले. आरोपीच्या अंगझडतीत जििे कंपनीचा ठशपे10 मोबाईल हॅन्डसेट तसेच आधार कार्ड व इलेक्शन कार्ड मिळून आले आहेत. मोबाईल हॅन्डसेटची तपासणी करून आवश्यकता भासल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे विमानतळ, जिल्हा नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 चे कलम 7-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यास औपचारिक अटक करण्यात येणार आहे. सदर सापळा कारवाई सुरेश बनसोडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पर्यवेक्षण प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांनी केले आहे. तपासाची जबाबदारी श्रीमती माधुरी यावलीकर, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास त्वरित जवळच्या ला.प्र.वि. कार्यालयाशी संपर्क साधावा.

COMMENTS