Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

24 वर्षांनंतरही मैत्रीची नाळ तुटली नाही; गुजराती हायस्कूलच्या 2003 च्या दहावीच्या बॅचचे ‘उमंग’ स्नेहसंमेलन उत्साहात

नांदेड । प्रतिनिधीशालेय जीवनातील आठवणी, निरागस मैत्री आणि गुरुजनांबद्दलची कृतज्ञता यांचा भावपूर्ण संगम म्हणजे गुजराती हायस्कूल, नांदेड येथील सन 20

भाजपाच्या विकसित नांदेडसाठी घोषित केलेल्या निवडणूक संकल्पनाम्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी हजार कोटींची गरज
मुदखेडमध्ये वाळू माफियांचा उच्छाद: गोदावरीच्या पात्रात ’सक्शन मशीन’द्वारे अवैध उपसा, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष?
महापौर पदग्रहणाच्या कार्यक्रमात खा. गोपछडे यांची राजकीय टोलवाटोलवी

नांदेड । प्रतिनिधी
शालेय जीवनातील आठवणी, निरागस मैत्री आणि गुरुजनांबद्दलची कृतज्ञता यांचा भावपूर्ण संगम म्हणजे गुजराती हायस्कूल, नांदेड येथील सन 2003 च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘उमंग स्नेहसंमेलन’. हा स्नेहमेळावा 26 जानेवारी 2026 रोजी शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल 24 वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना पुन्हा एकदा उजाळा दिला.
गुजराती हायस्कूलमधून शिक्षण घेऊन आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत – उद्योग, व्यवसाय, नोकरी, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी या निमित्ताने एकत्र आले. अनेक जण परदेशात वास्तव्यास असतानाही त्यांनी या स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाशी जोडण्यात आले, ज्यामुळे अंतराची मर्यादा ओलांडून मैत्रीचा जिव्हाळा अधिक दृढ झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणार्‍या शिक्षकवृंदांचा विशेष सत्कार करण्यात आला. एल. के. कुलकर्णी, डी. आर. कुलकर्णी, उमाकांत देशमुख, रवि सुमठाणकर, सापळगांवकर सर, प्रदीप कुलकर्णी, गायकवाड टिचर, जोशी कळंबरकर, थापे टिचर, लीना शहा, चंद्रकला कुलकर्णी, मेघा जोशी, टोके टिचर, प्रणिता केसराळे, पदमजा जोशी, शकुंतला पांडे, ज्योती शिंदे, सीमा जोशी, अनिता मुळे, विद्या मुळे, मंगळूरकर टिचर, अनुराधा कुलकर्णी, अष्टूरकर टिचर, सुरेखा देशपांडे, प्रज्वला देशपांडे, प्रेमा साकोळकर, मिना ठाकूर आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी दिलेले योगदान उपस्थितांनी कृतज्ञतेने स्मरणात ठेवले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले विविध खेळ, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम, जुन्या आठवणींना उजाळा देणारे संवाद आणि अनुभवकथन यामुळे कार्यक्रमात रंगत आली. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद, समाधान आणि आपुलकीची झलक स्पष्टपणे दिसून येत होती. आपुलकी, स्नेह, मैत्री आणि जिव्हाळा यांचा सुरेल संगम अनुभवायला मिळालेला हा ‘उमंग स्नेहसंमेलन सोहळा’ केवळ एक कार्यक्रम न राहता, आयुष्यभर जपून ठेवावा असा एक अविस्मरणीय क्षण ठरला. गुजराती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी मैत्रीचे बंध कितीही वर्षांनीही तितकेच घट्ट राहतात, हे या स्नेहसंमेलनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

COMMENTS