Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक राष्ट्रप्रेमाची पिढी घडवतात : डॉ. स्वाधीन गाडेकर

राहाता : राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठतेचे संस्कार जपत शिस्त व गुणवत्तेचे धडे देऊन राहाता पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्

एकरुखे गावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
राहाता महाविद्यालयात  स्नेहसंमेलन उत्साहात
प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात बालआनंद मेळावा उत्साहात

राहाता : राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठतेचे संस्कार जपत शिस्त व गुणवत्तेचे धडे देऊन राहाता पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणारे गुरुवर्य मोहम्मद सय्यद हे शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन राहाता नगरपरिषदेचे लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी केले.

 ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राहाता नगरपरिषदेच्या वतीने सेवानिवृत्त आदर्श शिक्षक गुरुवर्य मोहम्मद सय्यद यांना शैक्षणिक क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

 यावेळी उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, नगरसेवक हाजी मुन्नाभाई शाह, प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, नितीन गाडेकर, नगरसेविका पूजा गिधाड, रविना माळी, पुष्पा आरणे, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, मंगल डांगे, अंजली सदाफळ, अनिता शेळके, शीतल बनकर, नीता गाडेकर, मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह शहरातील विविध विद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ व मान्यवरांच्या शुभहस्ते मोहम्मद सय्यद यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 पुरस्कार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि समर्पणाची भावना जपत शिक्षण क्षेत्रात आयुष्य वेचणारे सय्यद सर हे खऱ्या अर्थाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. शिस्तप्रिय व प्रेरणादायी शिक्षक म्हणून परिचित असलेल्या मोहम्मद सय्यद यांनी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, शिस्त आणि संस्कारांची बीजे विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. त्यांनी घडवलेली पिढी आजही संस्कार आणि शिस्तीपासून तसूभरही दूर गेलेली नाही.

 निष्कलंक व ऋषितुल्य शिक्षकाला प्रजासत्ताक दिनी जीवनगौरव सन्मान देण्याचे भाग्य लाभणे हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना डॉ. गाडेकर यांनी व्यक्त केली.

 दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली काम करताना मिळालेल्या संस्कारांनुसारच राहाता नगरपरिषदेच्या वतीने हा सन्मान देण्यात आल्याचे डॉ. गाडेकर यांनी सांगितले. या सन्मानामुळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS