Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निंबवी – सारोळा सोमवंशी रस्त्याच्या कामाची चौकशी करा;  ग्रामस्थांची मागणी

श्रीगोंदा : तालुक्यातील  निंबवी–कोरेगव्हाण – सारोळा सोमवंशी हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत करण्यात आला आहे. मात्र अवघ्या चार ते पाच महिन्यांतच सदर रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सध्या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे अशी अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून सदर रस्त्याचे काम हे मंजूर इस्टिमेटनुसार व निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे या कामाची तातडीने चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदारास रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे व दर्जेदार करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. तसेच आठ दिवसांच्या आत योग्य पद्धतीने रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. हे निवेदन कोरेगव्हाण गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बारगुजे, माजी सरपंच ऍड. संपतराव इधाटे, ह.भ.प. महेश महाराज नरोडे, मंगेश विटेकर, प्रसाद विटेकर, प्रतीक विटेकर तसेच अन्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत  तहसीलदार सचिन डोंगरे श्रीगोंदा यांना देण्यात आले.

विकासपर्वाचा वेग! जीवाचीवाडी ते रानुबाईचीवाडी रस्त्याचे काम युद्धपातळीवर
मुख्यमंत्री सडक रस्त्यांत गुणवत्तेचा घोटाळा
सडे गाव ते सडे फाटा रस्ता डांबरीकरण पूर्ण

श्रीगोंदा : तालुक्यातील  निंबवी–कोरेगव्हाण – सारोळा सोमवंशी हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत करण्यात आला आहे. मात्र अवघ्या चार ते पाच महिन्यांतच सदर रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सध्या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे अशी अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावरून सदर रस्त्याचे काम हे मंजूर इस्टिमेटनुसार व निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे या कामाची तातडीने चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदारास रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे व दर्जेदार करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. तसेच आठ दिवसांच्या आत योग्य पद्धतीने रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे.

हे निवेदन कोरेगव्हाण गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बारगुजे, माजी सरपंच ऍड. संपतराव इधाटे, ह.भ.प. महेश महाराज नरोडे, मंगेश विटेकर, प्रसाद विटेकर, प्रतीक विटेकर तसेच अन्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत  तहसीलदार सचिन डोंगरे श्रीगोंदा यांना देण्यात आले.

COMMENTS