Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ‘स्वीकृत सदस्य’

महसूलमंत्री बावनकुळे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्तावमुंबई : महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्

महायुतीचे अभिनंदन, पण,….!
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांत बदल
राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी आज मतदान

महसूलमंत्री बावनकुळे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव
मुंबई : महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी आणि विकासात्मक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या अनेक अनुभवी व्यक्ती आहेत. मात्र, महिला तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या आरक्षणामुळे अशा अनेक जाणकार व्यक्तींना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळू शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या अनुभवाचा ग्रामीण विकासासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्र्यांशीही सविस्तर चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल आणि त्यानंतर विधिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राज्यातील महापौर आरक्षणाची सोडत पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि कॅमेर्‍यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. अशा परिस्थितीत या प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे किंवा शंका व्यक्त करणे योग्य नसल्याचे सांगत, विजय वडेट्टीवार यांच्या टीकेवर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर धाराशिव, लातूर, परभणी आणि संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागांत भाजप आणि शिवसेना युती झाल्याचे त्यांनी नमूद केले. काही ठिकाणी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, गेल्या दहा वर्षांपासून निवडणुका न झाल्याने अनेक स्थानिक कार्यकर्ते इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. जिथे शक्य आहे तिथे युतीचा प्रयत्न केला जाईल, मात्र काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्र निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘एमआयएम’सोबत कोणतीही युती नाही
अचलपूर नगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना महसूलमंत्र्यांनी ठाम भूमिका मांडली. अचलपूरमध्ये भाजपचे नऊ नगरसेवक असून पक्ष सध्या अल्पमतात आहे. एमआयएम, काँग्रेस आणि उबाठा गटाने तेथे स्वतंत्र गट स्थापन केले आहेत. मात्र, भाजपचा एमआयएमसोबत कोणताही समझोता नाही आणि भविष्यातही त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

COMMENTS