Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये अपघातात दहा जवांनाचा मृत्यू

डोडा ः जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला. भद्रवाह-चंबा मार्गावरील खन्नी टॉप परिसरात हे वाहन सुमार

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण दुर्घटना भर रस्त्यात कारला लागली आग.
कसाराजवळ तीन मजुरांना डंपरने उडवले
चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू

डोडा ः जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला. भद्रवाह-चंबा मार्गावरील खन्नी टॉप परिसरात हे वाहन सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत देशाच्या 10 जवानांनी प्राण गमावले असून आणखी 10 जवान गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लष्कराची एक तुकडी ऑपरेशनल जबाबदारीसाठी सकाळी रवाना झाली होती. दुर्गम आणि डोंगराळ भागातून जात असताना तीव्र वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खोल दरीत कोसळले. वाहनात एकूण 20 जवान प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच लष्कर, पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती आणि आव्हानात्मक वातावरण असूनही युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले. घटनास्थळीच 10 जवानांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तर गंभीर जखमी अवस्थेतील 10 जवानांना तात्काळ उपचारासाठी बाहेर काढण्यात आले. जखमी जवानांना प्रथम भद्रवाह येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता, पुढील उपचारांसाठी त्यांना हवाईमार्गे उधमपूर येथील लष्कराच्या कमांड रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेबाबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील संदेशात त्यांनी म्हटले की, डोडा जिल्ह्यातील या दुर्दैवी अपघातात देशाने आपले 10 शूर जवान गमावले आहेत. त्यांच्या निष्ठावान सेवेचा आणि सर्वोच्च बलिदानाचा देश सदैव गौरव करेल. शोकाकुल कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून, संपूर्ण देश या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही नमूद केले आहे. तसेच जखमी जवानांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगून, त्यांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली आहे.

लष्करी वाहन 200 फूट दरीत कोसळून अपघात
जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भद्रवाह-चंबा आंतरराज्यीय मार्गावर भीषण अपघात झाला. खन्नी टॉप परिसरात लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत दहा जवानांचा मृत्यू झाला असून नऊ जवान गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बुलेटप्रूफ वाहनात सुमारे 20 जवान प्रवास करत होते. हे वाहन एका उंचावरील चौकीकडे जात असताना तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन थेट दरीत कोसळून हा अपघात झाला असून यात 10 जवानांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS