Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऍड. गवारे ‘एनआयए’च्या ‘स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटर’पदी 

कर्जत : तालुक्याचे भूमिपुत्र व विधिज्ञ ऍड. नितीन विठ्ठल गवारे यांची भारतातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या स्पेशल पब्ल

न्यायालयाला अतिरिक्त मजला; न्यायाधीशांसाठी नवीन कक्ष
सदगुरु कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा उत्साहात
तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास ‘अंबालिका’ सुरू होऊ देणार नाही : महेंद्र धांडे

कर्जत : तालुक्याचे भूमिपुत्र व विधिज्ञ ऍड. नितीन विठ्ठल गवारे यांची भारतातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटर पदावर नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिकृत अधिसूचनेद्वारे केली असून, मुंबई उच्च न्यायालयासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करणारी एनआयए ही देशाची अत्यंत महत्त्वाची तपास यंत्रणा मानली जाते. दहशतवादी हल्ले, राष्ट्रविरोधी कारवाया, देशाच्या अखंडतेला धोका पोहोचविणारे कट व संरक्षणाशी संबंधित संवेदनशील प्रकरणांची चौकशी व खटले चालविण्याची जबाबदारी या यंत्रणेकडे असते. अशा जबाबदारीच्या व विश्वासार्ह पदावर कर्जत तालुक्यातील एका सुपुत्राची निवड होणे ही संपूर्ण तालुक्यासाठी गौरवास्पद बाब ठरली आहे.

 नितीन गवारे यांनी आपल्या प्रदीर्घ कायदेविषयक कारकिर्दीत प्रामाणिकपणा, अभ्यासपूर्ण मांडणी, प्रभावी युक्तिवाद आणि न्यायप्रक्रियेबाबतची सखोल जाण यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध महत्त्वाच्या खटल्यांमधील त्यांचा अनुभव आणि कार्यकुशलता याची दखल घेतच केंद्र सरकारने त्यांची या पदासाठी निवड केली असल्याचे बोलले जात आहे.

त्यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या वतीने यांचे अभिनंदन करण्यात आले. 

या निवडीमुळे कर्जत तालुक्याला प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च तपास यंत्रणेत प्रतिनिधित्व मिळाले असून, ही बाब तालुक्यातील तरुण विधिज्ञांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. एडवोकेट नितीन विठ्ठल गवारे यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS