Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डायनॅमिक इंग्लिश स्कूलमध्ये ‘आनंदी बाजार’ उत्साहात 

 कर्जत : डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील शिक्षण न देता त्यांना जीवनोपयोगी व्यावहारिक ज्ञान, देवाण-घेवाण, व्यवहार कौशल्य व विक्री व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने ‘आनंदी बाजार – मार्केट डे’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध प्रकारचे दर्जेदार खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. स्वच्छता, चव व मांडणी याकडे विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष दिले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी शेतामधून आणलेला ताजा भाजीपाला विक्रीसाठी मांडला होता.   या आनंदी बाजाराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव  दामोदर अडसूळ, माजी तालुका विकास अधिकारी बाळासाहेब ढेरे, शाळेचे मुख्याध्यापक बी के थॉमस, समन्वयिका संगीता थोरात, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अनारसे, संस्थेचे संचालक एडवोकेट उत्तमराव नेवसे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.   यावेळी राजेंद्र फाळके यांनी विद्यार्थी शालेय जीवनामध्येच परिपूर्ण व्हावा यासाठी अशा पद्धतीचे वर्षभर अनेक उपक्रम विद्यालयांमध्ये राबवले जातात आजही मार्केट डे हा त्याचाच एक भाग आहे.   दामोदर अडसूळ म्हणाले की, इंग्रजी माध्यमाची शाळा असताना देखील आम्ही शैक्षणिक निकालामध्ये तालुक्यात अग्रेसर आहोत. आजचा मार्केट डे हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान होण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. आणि प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहे हेच याचे खूप मोठे यश आहे. प्राचार्य थॉमस यांनी सर्वांचे आभार मानले. \\\\\\\\\\\\\\\\\\\

कारखान्यांचा धुराडे बंद; कर्जतकरांचा श्वास मोकळा
फक्त पावसावर विसंबून असलेल्या शेतीचे शेतकऱ्यांने केले नंदनवन. वर्षाकाठी काढले ५० लाखाचे उत्पन्न.
कर्जतमधील ६ दुकाने सील नगरपंचायतची धडक कारवाई ; व्यवसायिक संतप्त

 कर्जत : डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील शिक्षण न देता त्यांना जीवनोपयोगी व्यावहारिक ज्ञान, देवाण-घेवाण, व्यवहार कौशल्य व विक्री व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने ‘आनंदी बाजार – मार्केट डे’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध प्रकारचे दर्जेदार खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. स्वच्छता, चव व मांडणी याकडे विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष दिले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी शेतामधून आणलेला ताजा भाजीपाला विक्रीसाठी मांडला होता.  

या आनंदी बाजाराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव  दामोदर अडसूळ, माजी तालुका विकास अधिकारी बाळासाहेब ढेरे, शाळेचे मुख्याध्यापक बी के थॉमस, समन्वयिका संगीता थोरात, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अनारसे, संस्थेचे संचालक एडवोकेट उत्तमराव नेवसे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी राजेंद्र फाळके यांनी विद्यार्थी शालेय जीवनामध्येच परिपूर्ण व्हावा यासाठी अशा पद्धतीचे वर्षभर अनेक उपक्रम विद्यालयांमध्ये राबवले जातात आजही मार्केट डे हा त्याचाच एक भाग आहे.

  दामोदर अडसूळ म्हणाले की, इंग्रजी माध्यमाची शाळा असताना देखील आम्ही शैक्षणिक निकालामध्ये तालुक्यात अग्रेसर आहोत. आजचा मार्केट डे हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान होण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. आणि प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहे हेच याचे खूप मोठे यश आहे. प्राचार्य थॉमस यांनी सर्वांचे आभार मानले.

\\\\\\\\\\\\\\\\\\\

COMMENTS