सातारा / प्रतिनिधी : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रति सरकारच्या सातारच्या भूमीत लवकरच पंधरावे विद्रोही साहित्
सातारा / प्रतिनिधी : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रति सरकारच्या सातारच्या भूमीत लवकरच पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी संयोजन समितीची स्थापना करण्यात आली असून वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार हभप डॉ. सुहास महाराज फडतरे यांची संयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. कार्याध्यक्षपदी पत्रकार व साहित्यिक कॉ. विजय मांडके व सरचिटणीस पदी अॅड. राजेंद्र गलांडे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे झालेल्या चौदाव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत कॉ. धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत सुटा संघटनेच्या सातारा येथील कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळ व सातारा जिल्ह्यातील शिव, शाहू, फुले, आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच्या पुरोगामी चळवळीतील लेखक, कलावंत, कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत संयोजन समितीचे पदाधिकारी व संयोजन समिती स्थापन करण्यात आली.
संयोजन समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य पुढीलप्रमाणे : मार्गदर्शक मंडळामध्ये पद्मश्री लक्ष्मण माने, अॅड. कॉ. सयाजीराव पाटील, अॅड. वर्षा देशपांडे, प्रा. डॉ. भास्कर कदम, कॉ. भगवानराव भोसले, जयंत उथळे, भगवान अवघडे, प्रा. ए. पी. देसाई, प्रा. दत्ताजीराव जाधव, अॅड. रवींद्र पवार तसेच सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद, उपाध्यक्ष मधुसूदन मोहिते, माजी प्राचार्य डॉ. अरुण गाडे, अॅड. दयानंद माने, प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, गणेश भिसे, अॅड. शरद जांभळे, प्रा. मंगला साठे, प्रा. डॉ. मृणालिनी आहेर, रश्मी लोटेकर, संघटक म्हणून डॉ. प्रशांत पन्हाळकर, दिलीप भोसले, कॉ. प्रमोद परामणे, अभिजीत भालेराव, गिरिष बनकर, वामन गंगावणे, जयवंत खराडे, प्रा. शंकर पवार, हणमंत सावंत, सौ. नीलिमा हांडे-कदम तसेच खजिनदार पदी राहुल गंगावणे यांची निवड करण्यात आली आहे.
संयोजन समितीमध्ये सातारा जिल्ह्यातील प्राध्यापक, कलाकार, साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
विद्रोही चळवळीचा व विचारांचा वारकरी संप्रदायातील संतांच्या कार्याशी जवळून संबंध असल्याने संयोजन समितीचे अध्यक्षपदी हभप डॉ. सुहास फडतरे महाराज यांची एक मताने निवड करण्यात आल्याची माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
सातारा प्रति सरकार, सत्यशोधक चळवळ तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोरले प्रतापसिंह महाराज या सर्वांचा सातार्याशी असलेला संबंध यावर लेखन चर्चा आणि भेटी घडवून आणण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली अशी माहिती कॉ. धनाजी गुरव यांनी दिली.

COMMENTS