Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकात्मिक घटक मुंबईंत कोट्यावधींचा गैरव्यवहार

मानवलोक संघटनेची राज्यपाल, लोकायुक्तांकडे तक्रारमुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील एकात्मिक घटक मुंबईमध्ये कार्यकारी अभियंत्यांच्या कृपाशिवार्दामुळे

वीज पुरवठा खंडित करण्याच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक
ऑनलाइन औषध खरेदी करताना फसवणूक
भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून 35 हजारांची फसवणूक

मानवलोक संघटनेची राज्यपाल, लोकायुक्तांकडे तक्रार
मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील एकात्मिक घटक मुंबईमध्ये कार्यकारी अभियंत्यांच्या कृपाशिवार्दामुळे कोट्यावधींचा गैरव्यवहार सुरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. सर्वसामान्यांचा पैसा ओरबाडून अधिकार्‍यांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार एकात्मिक घटक मुंबईत केला असून यासंदर्भात मानवलोक संघटनेने राज्यपाल आणि लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, एकात्मिक घटक मुंबई विभागात कार्यकारी अभियंता यांच्या कृपाशिवार्दाने उपअभियंता आणि शाखा अभियंता यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार चालवला असून, नियमबाह्य कामांचा धडाका लावला आहे. कामांना मंजुरी देतांना कोणतेही नियम न बघता केवळ टक्केवारी बघून बोगस कामांचा धडाका लावला आहे. तसेच या कामांपोटी कोट्यावधी रूपयांची बोगस देयके अदा करण्याचा सपाटा या विभागाने चालवला आहे. यासंदर्भात मानवलोक संघटनेने राज्याचे राज्यपाल आणि लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली असून, त्या तक्रारीत या विभागातील गैरव्यवहारांची चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. या विभागाची झाडाझडती घेतल्यास कोट्यावधी रूपयांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस येणार असून अधिकार्‍यांच्या कामकाजाची आणि त्यांनी कार्यकालीन कामात घेतलेल्या निर्णयांची देखील चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

जे.जे. रूग्णालयाचे उपअभियंता शिंगाडे यांचा भ्रष्टाचार
सावजिनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले जे.जे. रूग्णालयाच्या संदर्भात उप अभियंता शिंगाडे, शाखा अभियंता विजय पाटील, संतोष पाटील, सोनवणे यांनी मोठा धुडगूस घातला असून कोट्यावधी रूपयांची बोगस बिले अदा करून मोठा भ्रष्टाचार चालवला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या अधिकार्‍यांची विभागाीय चौकशी करण्याची मागणी जोर धरतांना दिसून येत आहे. यासंदर्भातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे उप अभियंता शिंगाडे यांच्या गैरकारभाराविरोधात नागपुरात हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात येणार होती. मात्र ती मांडू नये? यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. ती लक्षवेधी कोण मांडणार होते ? ती लक्षवेधी मांडू नये ? यासाठी कुणी प्रयत्न केले, यासंदर्भातील सविस्तर तपशील लवकरच.

COMMENTS