अकोले : हिंद सेवा मंडळ, अहिल्यानगर संचलित माॅडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सोमचंद शहा काॅमर्स व भास्करराव कदम गुरूजी सायन्स, अकोलेच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विशेष हिवाळी शिबीराचा उद्घाटन समारंभ शेरणखेल, (ता. अकोले) या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य दिलीप शहा यांनी अध्यक्षपद भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मोरेश्वरजी धर्माधिकारी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यादरम्यान त्यांनी श्रमाचे व संस्कारांचे जीवनातील मूल्य, युवकांनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी,स्वयंसेवकांनी हे गुण अंगिकारले तर सुसंस्कृत समाज तयार होईल याचे सर्व श्रेय स्वयंसेवकांना मिळेल यासाठी संस्कृतमधील श्लोकांचा आधार त्यांनी घेतला. याप्रसंगी शेरणखेल गावचे ग्रामस्थ विनोद हांडे, प्रकाश कासार, मच्छिंद्र कासार, निवृत्ती सूर्यवंशी, रामचंद्र कासार, विजया कोकणे, ग्रामसेवक संतोष देशमुख,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक वायाळ, कानवडे, हासे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ज्युनिअर काॅलेजचे उपप्राचार्य दीपक जोंधळे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्षीय सूचना सहा.कार्यक्रम अधिकारी केदार भिंगारदिवे यांनी केली व त्यास सहा.कार्यक्रम अधिकारी ऋषिकेश नगरकर यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.कार्यक्रम अधिकारी कोल्हे.एम.जी.यांनी केले तर मुख्य कार्यक्रम अधिकारी संपत वाळके यांनी आभार मानले.
अकोले : हिंद सेवा मंडळ, अहिल्यानगर संचलित माॅडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सोमचंद शहा काॅमर्स व भास्करराव कदम गुरूजी सायन्स, अकोलेच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विशेष हिवाळी शिबीराचा उद्घाटन समारंभ शेरणखेल, (ता. अकोले) या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य दिलीप शहा यांनी अध्यक्षपद भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मोरेश्वरजी धर्माधिकारी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यादरम्यान त्यांनी श्रमाचे व संस्कारांचे जीवनातील मूल्य, युवकांनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी,स्वयंसेवकांनी हे गुण अंगिकारले तर सुसंस्कृत समाज तयार होईल याचे सर्व श्रेय स्वयंसेवकांना मिळेल यासाठी संस्कृतमधील श्लोकांचा आधार त्यांनी घेतला.
याप्रसंगी शेरणखेल गावचे ग्रामस्थ विनोद हांडे, प्रकाश कासार, मच्छिंद्र कासार, निवृत्ती सूर्यवंशी, रामचंद्र कासार, विजया कोकणे, ग्रामसेवक संतोष देशमुख,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक वायाळ, कानवडे, हासे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ज्युनिअर काॅलेजचे उपप्राचार्य दीपक जोंधळे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्षीय सूचना सहा.कार्यक्रम अधिकारी केदार भिंगारदिवे यांनी केली व त्यास सहा.कार्यक्रम अधिकारी ऋषिकेश नगरकर यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.कार्यक्रम अधिकारी कोल्हे.एम.जी.यांनी केले तर मुख्य कार्यक्रम अधिकारी संपत वाळके यांनी आभार मानले.

COMMENTS