कर्जत : समाजासाठी निस्वार्थपणे देत राहणे हा वृक्षाचा गुण असून तोच दात्याचा धर्म मनुष्याने अंगीकारावा, असे प्रतिपादन दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने पठारवाडी (ता. कर्जत) येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पठारवाडीचे ग्रामस्थ मोहन शिंदे होते. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, सरपंच शरद यादव, उपसरपंच नितीन तोरडमल, माजी सरपंच विजय तोरडमल, ग्रामपंचायत सदस्य शेखर पठाडे, तुकाराम पठाडे, महादेव चौधरी, भास्कर चौधरी, मधुकर भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ, रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. नगरकर म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या. स्वामी विवेकानंद यांनी तरुणाईवर विश्वास व्यक्त करत देशाचे भविष्य त्यांच्या हाती असल्याचे सांगितले होते. युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठीच राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत असून आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असली तरी तिला योग्य दिशा देण्याची गरज आहे. श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून गावाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळते. ‘देणाऱ्याने देत जावे’ या विचारातून तरुणांनी समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात मोहन शिंदे यांनी शिबिरार्थींना पठारवाडी गावाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. युवकांच्या सहभागामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास भोसले यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी साक्षी वाघ हिने केले, तर आभार डॉ. कैलास रोडगे यांनी मानले.

कर्जत : समाजासाठी निस्वार्थपणे देत राहणे हा वृक्षाचा गुण असून तोच दात्याचा धर्म मनुष्याने अंगीकारावा, असे प्रतिपादन दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने पठारवाडी (ता. कर्जत) येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पठारवाडीचे ग्रामस्थ मोहन शिंदे होते. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, सरपंच शरद यादव, उपसरपंच नितीन तोरडमल, माजी सरपंच विजय तोरडमल, ग्रामपंचायत सदस्य शेखर पठाडे, तुकाराम पठाडे, महादेव चौधरी, भास्कर चौधरी, मधुकर भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ, रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. नगरकर म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या. स्वामी विवेकानंद यांनी तरुणाईवर विश्वास व्यक्त करत देशाचे भविष्य त्यांच्या हाती असल्याचे सांगितले होते. युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठीच राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत असून आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असली तरी तिला योग्य दिशा देण्याची गरज आहे. श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून गावाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळते. ‘देणाऱ्याने देत जावे’ या विचारातून तरुणांनी समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात मोहन शिंदे यांनी शिबिरार्थींना पठारवाडी गावाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. युवकांच्या सहभागामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास भोसले यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी साक्षी वाघ हिने केले, तर आभार डॉ. कैलास रोडगे यांनी मानले.

COMMENTS