Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरेश गुड्डे यांनी ’गुरुजी’ या शब्दाची प्रतिष्ठा निर्माण केली ः सुखदेव सुकळे

श्रीरामपूर ः भारतीय संस्कृती आणि ज्ञानमूल्यांची जीवनभर जोपासणा करणारे श्री सुरेश गड्डे गुरुजींनी ’गुरुजी’ या शब्दाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक

श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदारवर गोळीबार
’संतश्री’ पुस्तक म्हणजे संतवृत्तीचा शब्दसंस्कार : डॉ.बाबुराव उपाध्ये
शिव प्रहार संघटनेच्या चिथावणीखोर वक्तव्याचा ख्रिश्चन समाजाच्या वतीने निषेध नोंदवून कारवाई करण्याची मागणी

श्रीरामपूर ः भारतीय संस्कृती आणि ज्ञानमूल्यांची जीवनभर जोपासणा करणारे श्री सुरेश गड्डे गुरुजींनी ’गुरुजी’ या शब्दाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सेवेची प्रतिष्ठा निर्माण केली असल्याचे प्रतिपादन विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी केले.
   श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपुलाजवळील माऊली वृद्धाश्रामात सुरेश गड्डे गुरुजींचा सन्मान करताना ते बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्री गड्डे गुरुजींचे मोठेपण व्यक्त करून सत्कार केला. विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे, अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, सेवानिवृत्त शिक्षक किसनराव निकम, तुंगार गुरुजी, गोरक्षनाथ अकोलकर आदिंनी गड्डे गुरुजींचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. सुखदेव सुकळे यांनी पुढे सांगितले की, गडुगुरुजींनी गेल्या एक्याऐंशी वर्षात जी सेवासंस्कृती जोपासली तो आदर्श असल्याचे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS