Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजबे महाराजांचे नातू संस्कार खिलारे याला राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक

कडा । प्रतिनिधीआष्टी तालुक्यातील शिराळ येथील ह.भ.प. हौसराव आजबे महाराज यांचे नातू संस्कार सुप्रिया संजय खिल्लारे (इयत्ता दहावी) याने 69 व्या राष्ट

Beed : परळी रेल्वेस्थानकात पाणीच पाणी (Video)
गुजर समाज निवडणुकीसाठी एकवटला
आदित्य पॉलीटेक्निकच्या दोन विद्यार्थींची भारतीय नौदलात निवड

कडा । प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील शिराळ येथील ह.भ.प. हौसराव आजबे महाराज यांचे नातू संस्कार सुप्रिया संजय खिल्लारे (इयत्ता दहावी) याने 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या संस्कार खिल्लारे याने झारखंड राज्यातील रांची येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारतीय फेरीतील वैयक्तिक एलिमिनेशन गटात रौप्यपदकाची कमाई केली. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा रांची येथील बिरसा मुंडा अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम येथे पार पडली. देशभरातील सर्वोत्तम खेळाडूंशी सामना करत संस्कारने सातत्यपूर्ण, संयमी व आत्मविश्वासपूर्ण खेळाचे दर्शन घडवले. दबावाच्या क्षणी अचूक लक्ष्यभेदन करत त्याने आपली मानसिक ताकद सिद्ध केली. संस्कार हा सध्या गुरुकुल गोखळी येथे शिक्षण घेत असून अभ्यासासोबत क्रीडा साधनेतही सातत्य ठेवत त्याने राष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता सिद्ध केली आहे. प्रशिक्षक जुबेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे घवघवीत यश संपादन केले. या यशामागे त्याचे वडील संजय खिल्लारे व आई सुप्रिया खिल्लारे यांचा मोलाचा पाठिंबा लाभला आहे. संस्कारच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे इंदापूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. त्याच्या या यशाबद्दल काशीबाई खिलारे, विश्वनाथ खिलारे, ह.भ.प. हौसराव आजबे, कावेरी आजबे, गणेश आजबे, प्रतीक्षा आजबे, केशव खिलारे, वैष्णवी खिलारे, सिंधु खिलारे, शिवाजी आजबे, गुलाब आजबे यांच्यासह शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्कारच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.

COMMENTS