Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ.संभाजीनगरमध्ये मतमोजणीवेळी पोलिसांचा लाठीचार्ज

शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन जखमी; मंत्री शिरसाट यांचा पोलिसांवर गंभीर आरोपछत्रपती संभाजीनगर : शहरातील मतमोजणी केंद्रावर झालेल्या पोलिस लाठीच

मनपातील मेहनतीचे फळ? ‘त्या’ भाजप कार्यकर्त्यांसाठी जि. प. उमेदवारीचा राजकीय संदेश
अकोटमध्ये विजयी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
सत्तेच्या विजयावर डाग, संघर्षाच्या पराभवाला तेज ; उद्धव ठाकरेंचा सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल

शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन जखमी; मंत्री शिरसाट यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मतमोजणी केंद्रावर झालेल्या पोलिस लाठीचार्जमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईत सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) चे माजी महापौर विकास जैन जखमी झाले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. या घटनेवर सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
राज्यात छत्रपती संभाजीनगरसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची आज मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलानुसार अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुती आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. संभाजीनगरमध्ये चार ठिकाणी मतमोजणी केंद्रे असून निकाल जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रावर सकाळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईत विकास जैन यांना मारहाण झाली असून ते जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आज मतमोजणी आहे, मतदान नाही. हे साधे भानही अधिकार्‍यांना कसे राहत नाही? जखमी झालेले कार्यकर्ते हे आमचे अधिकृत प्रतिनिधी असून त्यांच्याकडे ओळखपत्रे आहेत. तरीही त्यांना जनावरांसारखी वागणूक देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

व्हिडिओ व्हायरल, कारवाईवर प्रश्‍नचिन्ह
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी काही नागरिकांना घेरून काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने झाडाजवळ बसून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावरही लाठीचा मारा झाल्याचे चित्रण व्हिडिओत आहे. केवळ केंद्रात प्रवेश देण्याच्या मागणीवरूनच ही कारवाई झाल्याचा दावा केला जात आहे.

COMMENTS