Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मशाल थंडावली, इंजिनची गतीही संपली ः सरनाईक यांची टीका

मुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निकालांचे संकेत स्पष्ट होताच आरोप-प्रत्या

भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी !
मुंबई जिंकली, पण महापौर कोण? भाजप-शिंदे सेनेत पडद्यामागे हालचाली सुरू
Nanded : कोणी सोडून गेल्याने भाजपाला फरक पडत नाही (Video)

मुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निकालांचे संकेत स्पष्ट होताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंवर थेट आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे.
सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. मशाल आता विझली आहे आणि मनसेच्या इंजिनची धूरधडपडही थांबली आहे, असे म्हणत त्यांनी दोन्ही नेत्यांच्या राजकारणाला आव्हान दिले. सरनाईक म्हणाले की, राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापालिका निवडणुका सुरू असताना ठाकरे बंधूंनी प्रचाराकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. केवळ शेवटच्या काही दिवसांत प्रचाराचा देखावा उभा करून महाराष्ट्र जिंकता येईल, असा गैरसमज त्यांना होता. त्यांच्या मते, ठाकरे बंधूंचे राजकारण मुंबई आणि ठाणे या दोन शहरांपुरतेच सीमित राहिले असून उर्वरित महाराष्ट्रातील 27 महापालिकांकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. प्रचाराच्या पद्धतीवरही सरनाईकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ज्यांना राज्यातील इतर भागांतील जनतेच्या प्रश्‍नांशी काही देणेघेणे नाही, अशा नेत्यांना जनता दीर्घकाळ स्वीकारत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आजच्या निकालांमधून हीच वस्तुस्थिती समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.

पुणे-पिंपरीत भाजपची ’लाट’
काका-पुतण्या एकत्र येऊनही राष्ट्रवादीची धूळधाण
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवत बहुमताचा आकडा पार केला आहे. पुणे महापालिकेत भाजपने 90 जागांवर मुसंडी मारत सत्तेसाठी आवश्यक 82 चा आकडा सहज ओलांडला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने 81 जागांसह सत्ता कायम राखली. पुण्यात काका-पुतण्याला एकी करुनही राष्ट्रवादीला तगडा झटका बसला आहे. अजित पवारांना केवळ 7 तर शरद पवारांना 3 जागांवर आघाडी मिळाली आहे.

13 पालिकांमध्ये एमआयएमचे 95 उमेदवार विजयी
महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत असल्या तरी, या निकालातील सर्वात ठळक बाब म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने केलेली अभूतपूर्व मुसंडी. भाजप व पारंपरिक प्रादेशिक पक्षांबरोबरच आता एमआयएम हा महापालिका राजकारणातील एक महत्त्वाचा घटक ठरत असल्याचं या निकालांमधून अधोरेखित झाले आहे. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे एकूण 95 उमेदवार विजयी झाले आहेत.

लातूर महापालिका (एकूण जागा-70)
काँग्रेस – 47
भाजप – 22
राष्ट्रवादी (अजित पवार)- 01

पुणे – (एकूण जागा – 165)
भाजप – 90
राष्ट्रवादी + – 20
काँग्रेस – 10
शिंदे गट – 02

छत्रपती संभाजीनगर – (एकूण जागा – 115)
भाजप – 56
शिंदे गट – 15
काँगे्रस -5
ठाकरे गट – 6
एमआयएम ः 24
इतर -9


पिंपरी चिंचवड (एकूण जागा -128)
भाजप – 81
राष्ट्रवादी + – 37
शिंदे गट – 9
इतर ड्ढ 1

नागपूर – (एकूण जागा 151)
भाजप – 106
काँग्रेस – 37
ठाकरे गट – 1
राष्ट्रवादी (अजित पवार) -1
इतर – 6


मुंबई महापालिका (225/227)

भाजप 97
शिंदे गट 30
ठाकरे गट 64
मनसे 09
काँग्रेस+ 15
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 01
इतर 11


भाजपने इतिहास रचला ः मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या युतीबद्दल बोलताना म्हटले की, सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपने पुन्हा एकदा राज्यात दणदणीत विजय मिळवला आहे. हा विजय भाजपच्या विकास आणि प्रगतीच्या दृष्टिकोनावर जनतेचा विश्‍वास दर्शवितो.


अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी-भाजपची युती सुसाट
अहिल्यानगरमध्ये देखील महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपची युती होती. शहराचे आमदार संग्राम जगताप आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व्यूहरचना आखत आधीच पाच नगरसेवक बिनविरोध केल्यानंतर उर्वरित 63 जागांसाठी मतदान पार पडले. यानंतर झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँगे्रसने एकूण 27 जागांवर तर भाजपने 25 जागांवर विजय मिळवला. काँगे्रसला अवघ्या दोन जागा तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले नाही. तर शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदरात 10 जागा पडल्या असून ठाकरे यांच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली आहे. एमआयएमला 2 तर बसपाला एक जागा मिळाली आहे.


मुंबईतून ठाकरे बंधूंना नाकारण्याचे प्रमुख कारणे कोणती ?
मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ठाकरे बंधूंची ताकद वाढल्याचे चित्र दिसत असले तरी निकालानंतर हे चित्र आभासी ठरल्याचे दिसून आले. याचे प्रमुख कारण म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी जास्तीत जास्त सभा घेण्यावर भर दिला नाही. दोन-तीन सभा वगळता प्रचारावर प्रामुख्याने भर दिला नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काँगे्रस आणि वंचितच्या आघाडीने ठाकरे बंधूंना सत्तेपासून दूर ठेवले. त्यासोबतच भाजपने सर्व ताकद पणाला लावत संघटनात्मक महत्वपूर्ण बदल करत आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यामुळे भाजप दोन्ही ठाकरे बंधूंना सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाली.

COMMENTS