Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवगण महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा

बीड । प्रतिनिधी नवगण महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे तसेच उप

बीडचे पालकमंत्री धनुभाऊंच्या मुजोर ठेकेदाराने पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची वाट लावली
उमरीत शिवजन्मोत्सव निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन
केजमध्ये जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात संपन्न; मान्यवरांची मांदियाळी

बीड । प्रतिनिधी
नवगण महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे तसेच उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र मचाले यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. उद्धव मुळे यांनी राज्य क्रीडा दिनाचे महत्त्व विशद करत क्रीडाक्षेत्रातील शिस्त, मेहनत व समर्पण हे यशस्वी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी महाराष्ट्राचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते थोर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाचा गौरव करत विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल कारकीर्द घडवावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जाणीव, शारीरिक तंदुरुस्ती तसेच स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

COMMENTS