Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तामसा येथे अल्पसंख्याक समाजासाठी उभारण्यात येणार्‍या शादीखाण्याचे काम कधी पूर्ण होणार?

बंद पडलेले बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणीतामसा  प्रतिनिधीहदगाव तालुक्यातील तामसा येथे अल्पसंख्याक समाजासाठी उभारण्यात येणार्‍या शादीखाण्याच्य

शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
विद्यार्थ्यांच्या हाणामारीत दोन विद्यार्थी जखमी
भाजी-भाकरीच्या महाप्रसादासाठी जनसागर उसळला

बंद पडलेले बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी
तामसा  प्रतिनिधी
हदगाव तालुक्यातील तामसा येथे अल्पसंख्याक समाजासाठी उभारण्यात येणार्‍या शादीखाण्याच्या बांधकामाला नेमके कोणाचे ग्रहण लागले आहे, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. मागील चार महिन्यांपासून हे बांधकाम पूर्णतः बंद असून, ते तातडीने सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी अल्पसंख्याक समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी या शादीखाण्याचे मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले होते. या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाला होता. मात्र प्रत्यक्षात संबंधित सत्य साई कन्स्ट्रक्शन कंपनीने सुरुवातीला केवळ पायाभरणी करून काम अर्धवट अवस्थेत सोडून दिले. मागील चार महिन्यांपासून एकही कामगार अथवा बांधकामाची हालचाल सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे संबंधित कंत्राटदाराचा भ्रमणध्वनी सातत्याने संपर्क क्षेत्राबाहेर (नॉट रिचेबल) दाखवत असल्याचेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर तामसा येथील अल्पसंख्याक समाजातील सामाजिक कार्यकर्ते जिया बागवान, फिरोज पाशा, सय्यद निसार, निशाद खान पठाण, अ. आरेफ, मुस्ताक खान यांनी मुख्य अभियंता (बांधकाम), भोकर यांना निवेदन सादर करून बांधकाम तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या शादीखाण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून विविध लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने निवेदने देण्यात येत होती. अखेर सन 2024-25 मध्ये अल्पसंख्याक ग्रामीण बहुल क्षेत्र विकास योजनेंतर्गत 1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मोठ्या गाजावाजात भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्ष काम मात्र संथ गतीने सुरू होऊन पूर्णतः बंद पडले आहे. सदर शादीखाण्याच्या बांधकामास कोणतीही प्रशासकीय अथवा कार्यालीन अडचण नसून, अंदाजे 32 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला असतानाही कंत्राटदाराने काम का थांबवले, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित कंत्राटदाराला विभागामार्फत नोटीस बजावण्यात आली असून, यासंदर्भातील सविस्तर माहिती उपविभागीय अभियंता यांच्याकडे उपलब्ध असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम अभियंता श्री. घुलेकर (हदगाव) यांनी सांगितले. दरम्यान, हे रखडलेले बांधकाम लवकरात लवकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS