अर्धापूर । प्रतिनिधीशहरातील एज्युव्हिजन , न्यू इरा किड्स इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साह

अर्धापूर । प्रतिनिधी
शहरातील एज्युव्हिजन , न्यू इरा किड्स इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रवीण रावते हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इरा किड्स शाळेचे प्राचार्य प्रतीक चवरकर, प्राचार्य सौ प्रिया रावते,विभाग प्रमुख स्वाती पांचाळ उपस्थित होत्या.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवन चरित्र्यावर सुंदर अशी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमधून भाषणे केली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी माँ साहेब जिजाऊ यांच्या वेशभूषेमध्ये येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतुन सिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन अशीतोष पुरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्ग तसेच कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती रेखाताई रावते यांनी सर्वांचे कौतुक केले.

COMMENTS