Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेबी बर्डे देवळाली प्रवराचे उपनगराध्यक्ष 

सचिन शेटे, ऋषभ लोढा स्वीकृत नगरसेवक देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या बेबी संजय बर्डे यांची १७ मतांनी निवड झ

यात्रेदरम्यान हाणामारी; गाडी जाळली 
पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जणांची धडपड
मजूर पाहायला आलेल्यांना राहुरीत लुटले

सचिन शेटे, ऋषभ लोढा स्वीकृत नगरसेवक

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या बेबी संजय बर्डे यांची १७ मतांनी निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीचे संतोष एकनाथ चोळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना अवघी पाच मते मिळाली. स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाच्या सचिन सोपान शेटे व ऋषभ नंदकुमार लोढा यांची निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी यांनी जाहिर केले.

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी प्रथम उपनगराध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पाडली. उपनगराध्यक्षपदासाठी बेबी संजय बर्डे व संतोष एकनाथ चोळके यांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. बेबी संजय बर्डे यांना भाजपाची १६ मते व शिवसेना शिंदे गटाचे एक मत, अशी एकूण १७ मते मिळाली. तर संतोष चोळके यांना काँग्रेसची चार व वंचित बहुजन आघाडीचे एक मत, अशी एकूण पाच मते मिळाली.

या बैठकीस भाजपाचे अजित चव्हाण, मनीषा कदम, सीमा देठे, सौरभ मुसमाडे, सुवर्णा कोठूळे, सिंधूबाई वाळूंज, पुष्पा तांबे, अमोल कदम, प्रकाश संसारे, सुजाता कदम, राजेंद्र लोखंडे, चंदाराणी गाडे, वसंत कदम, जयश्री खांदे, शिवसेना शिंदे गटाच्या आशाताई चव्हाण, काँग्रेसचे तुकाराम पठारे, सुनिता थोरात, पल्लवी ढुस, शरद वाळूंज तसेच वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आदी उपस्थित होते.पहिल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजासाठी प्रभारी मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप, कार्यालयीन अधीक्षक दीपक जग्रवाल, तुषार सुपेकर, राजेंद्र हारगुडे, सागर होले आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

COMMENTS