Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयासाठी  मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षणाला मंजुरी

सभापती प्रा. शिंदेचा पाठपुरावा   जामखेड : तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला पिण्यासाठी व शेतीसाठी शा

अहिल्यानगरमध्ये थरारक घटना! कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर दुचाकीस्वारांनी केला गोळीबार
पहाटे एकीकडे भक्तिसांगित दुसरीकडे दुधाचा काळा धंदा
पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

सभापती प्रा. शिंदेचा पाठपुरावा

  जामखेड : तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला पिण्यासाठी व शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने कृषि महाविद्यालयासाठी करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून पाणी आरक्षण मंजुर केले आहे.

जामखेड तालुक्यातील शेती शिक्षणासाठी महत्त्वाचे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला  पाणीपुरवठ्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. हळगाव कृषि महाविद्यालयासाठी सीना नदीवरील निमगाव गांगर्डे जलाशयातून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव यापूर्वी मंजूर करण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव रद्द करून, मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे)राधाकृष्ण विखे-पाटील व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे १० डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार कृष्णा खोरे महामंडळाने ९ जानेवारी २०२६ रोजी पाणी आरक्षण मंजुरीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार हळगाव कृषि महाविद्यालयास मांगी तलावातून ०.४२७२ दलघमी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.

    कृषि महाविद्यालयास पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता. त्या अनुषंगाने नागपूर हिवाळी अधिवेशन (डिसेंबर २०२५) काळात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत हळगावपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून हळगाव कृषी महाविद्यालयाकरिता पिण्यासाठी व प्रक्षेत्र सिंचनास पाणी उचलण्यास तत्वत: मान्यता देत नवा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयामुळे हळगाव कृषि महाविद्यालयाच्या विकासाला मोठी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २०१८ साली दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यातील शेती क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय हळगाव येथे मी मंजूर करून आणले. या कृषि महाविद्यालयास पिण्यासाठी व शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सरकारने कृषि महाविद्यालयासाठी मांगी तलावातून पाणी आरक्षण मंजूर केले आहे. त्याचबरोबर या आधी ५ मे २०२५ रोजी महाविद्यालयासाठी १४ कोटी ३२ लाख ८९ हजार रूपये खर्चाचे सभागृह सरकारने मंजूर केलेले आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयाच्या विकासाला विशेषता: कृषि संशोधनाला गती मिळणार आहे.

– प्रा राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधान परिषद.

COMMENTS