Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाला चोपले

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे कमालीची रंगतदार झाली आहे. गेल

भाजप आज देशात जनतेची पहिली पसंती ठरतोय : पंतप्रधान मोदी
हिमाचल प्रदेशात भाजपला बंडखोरीचे ग्रहण
छ.संभाजीनगर महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे कमालीची रंगतदार झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाकयुद्धामुळे नवी मुंबईतील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली.
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला. हा कार्यकर्ता संशयाच्या भोवर्‍यात सापडल्यानंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारण्याऐवजी थेट मारहाण केल्याचा आरोप होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये संबंधित कार्यकर्त्याचे हात पाठीमागे धरून त्याला फटके मारताना दिसत आहे. या झटापटीदरम्यान त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आल्याचेही दृश्य समोर आले आहे. घटनेदरम्यान संबंधित कार्यकर्ता वारंवार मला मारू नका अशी विनवणी करताना ऐकू येतो. काही काळ तो स्वतःचा बचाव करताना दिसला, मात्र परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. या घटनेमुळे निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतील राजकीय संघर्ष किती टोकाला गेला आहे, याचे विदारक चित्र समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी व्हायरल व्हिडीओमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदानापूर्वी अशा घटना वाढल्यास निवडणूक प्रक्रियेवर आणि जनतेच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता राजकीय व सामाजिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.

COMMENTS