अकोले : ए.एस.के. फाउंडेशन, मुंबईच्या आणि बायफ, नाशिक यांच्या पुढाकारातून रंधा येथे स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात ग्रामपंचायत, शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, महिला बचत गट, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तरुण वर्ग,तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अभियानाअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर आणि नाल्यांची साफसफाई करण्यात आली. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. “स्वच्छ भारत, स्वस्थ भारत” हा संदेश देत नागरिकांनी नियमित स्वच्छता राखण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ झाला असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली आहे. ए.एस.के. फाउंडेशनचे मॅनेजर अरुण बांबळे व बायफचे राम कोतवाल व विष्णू चोखंडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाउंडेशनचे सिद्धार्थ अय्यर आणि बायफचे सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कमिटचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभियानात भास्कर भोईर, मधुकर भोईर, मधुकर पटेकर, रामजी भोईर, विष्णू भोईर, संतोष देशमुख, लक्ष्मण पटेकर, सुनंदा भोईर, सरपंच सुंदरलाल भोईर, मच्छिंद्र कोरडे, कुंडलिक कोरडे, गणेश पटेकर, शाळेचे मुख्याध्यापक नाडेकर, देशमुख, शेळके, ग्रामसेवक काकड भाऊसाहेब, शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात घोषणा देत गावात प्रभात फेरी काढली.

अकोले : ए.एस.के. फाउंडेशन, मुंबईच्या आणि बायफ, नाशिक यांच्या पुढाकारातून रंधा येथे स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.
या अभियानात ग्रामपंचायत, शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, महिला बचत गट, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तरुण वर्ग,तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अभियानाअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर आणि नाल्यांची साफसफाई करण्यात आली.
नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. “स्वच्छ भारत, स्वस्थ भारत” हा संदेश देत नागरिकांनी नियमित स्वच्छता राखण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ झाला असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली आहे. ए.एस.के. फाउंडेशनचे मॅनेजर अरुण बांबळे व बायफचे राम कोतवाल व विष्णू चोखंडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाउंडेशनचे सिद्धार्थ अय्यर आणि बायफचे सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कमिटचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभियानात भास्कर भोईर, मधुकर भोईर, मधुकर पटेकर, रामजी भोईर, विष्णू भोईर, संतोष देशमुख, लक्ष्मण पटेकर, सुनंदा भोईर, सरपंच सुंदरलाल भोईर, मच्छिंद्र कोरडे, कुंडलिक कोरडे, गणेश पटेकर, शाळेचे मुख्याध्यापक नाडेकर, देशमुख, शेळके, ग्रामसेवक काकड भाऊसाहेब, शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात घोषणा देत गावात प्रभात फेरी काढली.

COMMENTS