Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसएसजीएम महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात  

कोपरगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छतेबरोबरच सार्वजनिक आरोग्य, जलसाक्षरता, आरोग्य व आहार, व्यसनमुक्ती, ऊर्जा साक्षरता, महिला स

शिवरायांचा कारभार हा लोककल्याणकारी होता : माजी आ. काळे
जनहिताला पहिल्याच दिवशी काळे गटाकडून मिठाचा खडा :  सोनवणे
15% लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे

कोपरगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छतेबरोबरच सार्वजनिक आरोग्य, जलसाक्षरता, आरोग्य व आहार, व्यसनमुक्ती, ऊर्जा साक्षरता, महिला सक्षमीकरण, अन्नसुरक्षा जनजागृती, नवमतदार जनजागृती व नोंदणी, लोकसंख्या नियंत्रण, वृक्षारोपण आदी उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा. अशा उपक्रमांतून स्वयंसेवकांना प्रत्यक्ष अनुभव मिळून राष्ट्रविकासाचे मर्म समजते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयातील मूल्यशिक्षणाची कार्यशाळाच आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे यांनी केले. ते एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत  बहादूरपूर  येथे सुरू झालेल्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब रहाणे होते.

 अध्यक्षीय मनोगतात त्यांनी स्वयंसेवकांना उत्कृष्ट कार्य करण्याच्या सूचना व शुभेच्छा दिल्या. रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. ऍड.भगीरथ शिंदे तसेच आ. आशुतोष काळे यांनी या श्रमसंस्कार शिबिरासाठी शुभेच्छा संदेश पाठवून स्वयंसेवकांचे कौतुक केले.

 यावेळी राहुल रोहमारे, ज्ञानेश्वर गव्हाणे, गोपीनाथ रहाणे (सरपंच, बहादुरपूर), गंगाधर राऊत, चंद्रकांत डोंगरे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत, डॉ.डी.एस.रणधीर, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, डॉ.बाळू वाघमोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी व कलाविभागाचे उपप्राचार्य  डॉ.बी.ए.तऱ्हाळ यांनी केले, तर आभार प्रा.एम.के.दिघे यांनी मानले.

COMMENTS