Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामदास शिंगाडे यांचा रयत सेवक समितीकडून सन्मान

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात कार्यरत असणारे रामदास शिंगाडे यांची रयत सेवक बॅंकेच्या कर्जत शाखा सभासद प्रतिनिधी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यावेळी रयत सेवक समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना रयत सेवक समितीचे अध्यक्ष सचिन झगडे यांनी रामदास शिंगाडे यांनी सभासदांचा आवाज बनून काम करावे, सभासदांच्या समस्या, अडचणी बँकेच्या प्रशासनाच्या मदतीने सोडवाव्यात असे भावना व्यक्त केली. सभासदांच्या समस्या सोडवण्याबाबत मी कटिबद्ध असेल असे विचार रामदास शिंगाडे यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर रयत सेवक समितीचे अध्यक्ष सचिन झगडे, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, उपप्राचार्य शहाजी एकाड, पर्यवेक्षिका सुनीता काकडे, विकास लोखंडे, सुधीर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

३१ मार्चपूर्वी कर्जफेड करा; कर्जमाफीचा लाभ घ्या;शेतकरी सभासदांना राजेंद्र नागवडे यांचे आवाहन
ब्रिटिशकालीन पोलिस वसाहतीतील साहित्य गायब : शेलार  
क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कार्य आजही प्रेरणादायी : पोटे

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात कार्यरत असणारे रामदास शिंगाडे यांची रयत सेवक बॅंकेच्या कर्जत शाखा सभासद प्रतिनिधी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यावेळी रयत सेवक समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना रयत सेवक समितीचे अध्यक्ष सचिन झगडे यांनी रामदास शिंगाडे यांनी सभासदांचा आवाज बनून काम करावे, सभासदांच्या समस्या, अडचणी बँकेच्या प्रशासनाच्या मदतीने सोडवाव्यात असे भावना व्यक्त केली. सभासदांच्या समस्या सोडवण्याबाबत मी कटिबद्ध असेल असे विचार रामदास शिंगाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी मंचावर रयत सेवक समितीचे अध्यक्ष सचिन झगडे, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, उपप्राचार्य शहाजी एकाड, पर्यवेक्षिका सुनीता काकडे, विकास लोखंडे, सुधीर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS