लिंबागणेश । प्रतिनिधीमराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक मोलाचा दिवस म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या पहि

लिंबागणेश । प्रतिनिधी
मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक मोलाचा दिवस म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या पहिल्या मराठी वृत्तपत्र *दर्पण*च्या स्मरणार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांनी सांभाळले, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते: स्वप्निल भैय्या गलधर, शिवसेना जिल्हाप्रमुख, राजेंद्रजी मस्के, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष हनुमान मुळीक, मराठा सेवक, तुलसीदास महाराज , कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे, अॅड. गणेश वाणी, माजी उपसरपंच शंकर वाणी, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, रमेश गायकवाड, अशोक जाधव, जीवन मुळे, सुरेश निर्मळ, सचिन आगवान, रवी वायभट, अंकुश गायकवाड, रामचंद्र मुळे, तुकाराम गायकवाड, संजय पावले, मोहन कोटुळे, नवनाथ मुळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. गणेश ढवळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन गणपत तागड यांनी केले. डॉ. गणेश ढवळे म्हणाले, पत्रकार दिन हा केवळ शुभेच्छांचा सोहळा नसून समाजाच्या आरशात उभ्या असलेल्या पत्रकारितेच्या दीर्घ, संघर्षमय व प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा घेण्याचा दिवस आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्रातून समाजाला दिशा दिली, तसेच ‘दिग्दर्शन’ मासिकातून सामाजिक प्रबोधन घडवून आणले. या कार्यक्रमाद्वारे मराठी पत्रकारितेच्या योगदानाची आठवण, सामाजिक जागृतीसाठी माध्यमांचे महत्त्व, तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग याकडे विशेष लक्ष वेधले गेले. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमात उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून दर्पण दिनाच्या महत्त्वाची जाणीव व्यक्त केली.

COMMENTS