Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभ्यास, व्यायाम व कलेतून व्यक्तीमत्व घडते : डॉ. गोर्डे

अकोले  : आळस,अज्ञान, अंधश्रद्धा हे तीन शत्रू आयुष्यातून काढून टाका. अभ्यासाने मेंदू,व्यायामाने शरीर तर कलेने मन ताकदवान बनते. म्हणूनच अभ्यास, व्यायाम व कला यातून व्यक्तीमत्व घडते असे प्रतिपादन साहित्यिक व व्याख्याते डॉ.संजय गोर्डे यांनी केले. राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.   यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. संजय गोर्डे विचारमंचावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक श्रीराम पन्हाळे हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी संचालक मिलिंद उमराणी, अशोक मिस्त्री, नंदकिशोर बेल्हेकर, रामजी काठे, निरीक्षक लहानू पर्बत, माजी प्राचार्य मनोहर लेंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ कुलाळ, उपाध्यक्ष त्रिंबक पराड,बाजिनाना भांगरे यांसह प्राचार्य मधुकर मोखरे,लिपीक भास्कर सदगीर, प्रवीण मालुंजकर, भाऊसाहेब कोते, ठकुबाई भांगरे, राजेविनोद साबळे, विक्रम आंबरे, सुधीर पराड, रामदास डगळे, योगेश बगाड, एस.बी.घोलप, पी.एन.भांगरे, एस.ए. मोहटे, एन.डी.डगळे, एस.एन.वाकचौरे, वाय.के.शिंदे, पी.के.बेणके, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम पन्हाळे यांनी पाठीवर शाबासकीची थाप महत्त्वाची असते. स्पर्धांत भाग घ्या, सराव करा आयुष्यात कोणतेच काम लहान नाही. हार न मानता धैर्याने सामोरे जा. कुटुंब,शाळा व गावाचे नाव रोशन करा असे प्रतिपादन केले. यावेळी संचालक मिलिंद उमराणी, अशोक मिस्त्री,नंदकिशोर बेल्हेकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक वर्षात कला, क्रीडा, सांस्कृतीक, चित्रकला, वेशभूषा, वक्तृत्व, निबंध लेखन यांसारख्या विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य मधुकर मोखरे यांनी,सूत्रसंचालन राजेविनोद साबळे तर विक्रम आंबरे यांनी आभार मानले.

शिक्षक म्हणजे माणूस घडवण्याचा प्रवास : आ. लहामटे
एसबीआयकडून  मृत खातेदारास 2 लाखांची मदत
रंधा येथे राबविले स्वच्छता अभियान

अकोले  : आळस,अज्ञान, अंधश्रद्धा हे तीन शत्रू आयुष्यातून काढून टाका. अभ्यासाने मेंदू,व्यायामाने शरीर तर कलेने मन ताकदवान बनते. म्हणूनच अभ्यास, व्यायाम व कला यातून व्यक्तीमत्व घडते असे प्रतिपादन साहित्यिक व व्याख्याते डॉ.संजय गोर्डे यांनी केले. राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

  यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. संजय गोर्डे विचारमंचावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक श्रीराम पन्हाळे हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी संचालक मिलिंद उमराणी, अशोक मिस्त्री, नंदकिशोर बेल्हेकर, रामजी काठे, निरीक्षक लहानू पर्बत, माजी प्राचार्य मनोहर लेंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ कुलाळ, उपाध्यक्ष त्रिंबक पराड,बाजिनाना भांगरे यांसह प्राचार्य मधुकर मोखरे,लिपीक भास्कर सदगीर, प्रवीण मालुंजकर, भाऊसाहेब कोते, ठकुबाई भांगरे, राजेविनोद साबळे, विक्रम आंबरे, सुधीर पराड, रामदास डगळे, योगेश बगाड, एस.बी.घोलप, पी.एन.भांगरे, एस.ए. मोहटे, एन.डी.डगळे, एस.एन.वाकचौरे, वाय.के.शिंदे, पी.के.बेणके, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम पन्हाळे यांनी पाठीवर शाबासकीची थाप महत्त्वाची असते. स्पर्धांत भाग घ्या, सराव करा आयुष्यात कोणतेच काम लहान नाही. हार न मानता धैर्याने सामोरे जा. कुटुंब,शाळा व गावाचे नाव रोशन करा असे प्रतिपादन केले. यावेळी संचालक मिलिंद उमराणी, अशोक मिस्त्री,नंदकिशोर बेल्हेकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक वर्षात कला, क्रीडा, सांस्कृतीक, चित्रकला, वेशभूषा, वक्तृत्व, निबंध लेखन यांसारख्या विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य मधुकर मोखरे यांनी,सूत्रसंचालन राजेविनोद साबळे तर विक्रम आंबरे यांनी आभार मानले.

COMMENTS