Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘काकडे’ फार्मसीचा बोधेगाव येथे अभ्यास दौरा 

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी, बोधेगाव (शेवगाव) यांच्या वतीने ‘प्रवेश जनजागृती अभियान २०२६’ अंतर्गत परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांचे महाविद्यालयामध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. दि. ५ जानेवारी २०२६ रोजी  महाविद्यालयात चापडगाव विद्यालय चापडगाव यांचे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या भेटीत १२ वी विज्ञान शाखेचे 54 विद्यार्थी व ३ शिक्षक सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली.या क्षेत्रभेटींचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना बी. फार्मसी व डी फार्मसी तसेच बीसीएस व बीसीए अभ्यासक्रमाची माहिती, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा तसेच फार्मसी व संगणक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व उच्च शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. हेमंत गांगुर्डे यांनी यावेळी दिली.  या उपक्रमादरम्यान महाविद्यालयात माहितीपत्रके वितरित करण्यात आली तसेच भौतीक सुविधा, प्रयोगशाळा, प्रशिक्षित प्राध्यापकवर्ग आणि उद्योगाभिमुख शिक्षण पद्धती, अद्ययावत ग्रंथालय व प्रशस्त संगणक लॅब यांची सविस्तर माहिती प्राध्यापक भरत जाधव यांनी दिली. तसेच महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम , स्पर्धा व विविध नामांकित औषध निर्माण कंपन्या मधे शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधे कॅम्पस मुलखातिद्वारे प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती  तसेच भविष्यातील विविध संधिबाबत माहिती प्राध्यापक संदिप खंडागळे यांनी  विद्यार्थ्यांना सादरीकरनाद्वारे समजावून सांगितली. प्रवेश जनजागृती अभियान २०२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.अशी माहिती चापडगाव विद्यालयाचे प्रा. आवारे  यांनी यावेळी दिली.संस्थेचे सेक्रेटरी डॉ.विद्याधर काकडे, मा. जि.प.सदस्या हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मणराव बीटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे, कॅम्पस डायरेक्टर भाग्यश्री पाटील यांनी सदर उपक्रमाबाबत बी फार्मसी प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे  व डी फार्मसी प्राचार्य. राजेश मोकाटे तसेच सर्व  बी व डी फार्मसी प्राध्यापकांचे कौतुक केले.

कॉ.आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव होत असल्याने साहित्यिकांमध्ये चैतन्य
उमेद कात्रण चिकटवही स्पर्धेचा निकाल जाहीर
‘काकडे कॉलेज ऑफ फार्मसी’ची क्षेत्रभेट उत्साहात

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी, बोधेगाव (शेवगाव) यांच्या वतीने ‘प्रवेश जनजागृती अभियान २०२६’ अंतर्गत परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांचे महाविद्यालयामध्ये क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. दि. ५ जानेवारी २०२६ रोजी  महाविद्यालयात चापडगाव विद्यालय चापडगाव यांचे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या भेटीत १२ वी विज्ञान शाखेचे 54 विद्यार्थी व ३ शिक्षक सहभागी झाले होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली.या क्षेत्रभेटींचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना बी. फार्मसी व डी फार्मसी तसेच बीसीएस व बीसीए अभ्यासक्रमाची माहिती, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा तसेच फार्मसी व संगणक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा होता अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व उच्च शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. हेमंत गांगुर्डे यांनी यावेळी दिली.

 या उपक्रमादरम्यान महाविद्यालयात माहितीपत्रके वितरित करण्यात आली तसेच भौतीक सुविधा, प्रयोगशाळा, प्रशिक्षित प्राध्यापकवर्ग आणि उद्योगाभिमुख शिक्षण पद्धती, अद्ययावत ग्रंथालय व प्रशस्त संगणक लॅब यांची सविस्तर माहिती प्राध्यापक भरत जाधव यांनी दिली.

तसेच महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम , स्पर्धा व विविध नामांकित औषध निर्माण कंपन्या मधे शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधे कॅम्पस मुलखातिद्वारे प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती  तसेच भविष्यातील विविध संधिबाबत माहिती प्राध्यापक संदिप खंडागळे यांनी  विद्यार्थ्यांना सादरीकरनाद्वारे समजावून सांगितली.

प्रवेश जनजागृती अभियान २०२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.अशी माहिती चापडगाव विद्यालयाचे प्रा. आवारे  यांनी यावेळी दिली.संस्थेचे सेक्रेटरी डॉ.विद्याधर काकडे, मा. जि.प.सदस्या हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मणराव बीटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे, कॅम्पस डायरेक्टर भाग्यश्री पाटील यांनी सदर उपक्रमाबाबत बी फार्मसी प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे  व डी फार्मसी प्राचार्य. राजेश मोकाटे तसेच सर्व  बी व डी फार्मसी प्राध्यापकांचे कौतुक केले.

COMMENTS