Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामविकासाला चालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीष महाजन यांच्या निधीतून वांगीत सभागृहांचे लोकार्पण

वांगी । प्रतिनिधीउपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व ग्रामविकास मंत्री मा. गिरीषजी महाजन साहेब यांच्या ग्रामविकास निधीतून (सन 2024-2025, 25/15

राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.
अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वांगी । प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व ग्रामविकास मंत्री मा. गिरीषजी महाजन साहेब यांच्या ग्रामविकास निधीतून (सन 2024-2025, 25/15 फंड) तसेच युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव (दादा) चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून वांगी येथे सुमारे 20 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन सभागृहांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.
या लोकार्पण सोहळ्यास युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव (दादा) चव्हाण प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्रीक्षेत्र वांगी येथील मठाधिपती श्री. स्वामी अभेदानंद गिरी महाराज, भवानीगड संस्थानचे स्वामी अखंडानंद गिरी महाराज, श्रीक्षेत्र नेवासा येथील ह.भ.प. भगवान महाराज जंगले शास्त्री, चिखलीकर श्री. स्वामी जगदिश्वरानंद गिरी महाराज यांची उपस्थिती लाभली. तसेच वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कमलाबाई वाघमारे, उपसरपंच श्री. अर्जुन मोतीराम शेळके, प्रविण शेळके, प्रशांत शेळके, हरीभाऊ शेळके यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन सभागृहांच्या उभारणीमुळे वांगी गावातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. ग्रामविकासाच्या दृष्टीने ही बाब मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS