Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माईलस्टोन स्कूलचा फन फेअर ठरला विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाची शाळा

140 स्टॉल, 3.50 लाखांची उलाढाल; 500 विद्यार्थ्यांनी केला प्रत्यक्ष व्यवहार, विक्री आणि मार्केटिंगचा घेतला अनुभवबीड । प्रतिनिधीआजच्या स्पर्धात्मक य

अशांतता निर्माण करणारे गुन्हेगार व चिथावणीखोरांवर कडक कारवाई करा 
बोगस बियाणांचा सुळसुळाट
मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सभेला विरोध करणाऱ्यांना दिला इशारा | LOK News 24

140 स्टॉल, 3.50 लाखांची उलाढाल; 500 विद्यार्थ्यांनी केला प्रत्यक्ष व्यवहार, विक्री आणि मार्केटिंगचा घेतला अनुभव
बीड । प्रतिनिधी
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, प्रत्यक्ष व्यवहारिक व व्यावसायिक कौशल्यांची जोड आवश्यक आहे. याच विचारातून माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक फन फेअर व क्रीडा संमेलन हा विद्यार्थ्यांसाठी खर्‍या अर्थाने व्यवसायाची शाळा ठरला. शाळेतील पहिली ते 7 वी च्या विद्यार्थांनी खाद्य पदार्थांचे 140 स्टॉल लावले होते. याला पालकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने तब्बल 3.50 लाखांची उलाढाल झाली. यामध्ये 500 विद्यार्थी आणि 1 हजार पालक सहभागी झाले होते. विद्यार्थांनी प्रत्यक्ष व्यवहार, विक्री आणि मार्केटिंगचा अनुभव घेतला.
या फन फेअरमध्ये विद्यार्थ्यांनी उभारलेल्या स्टॉलपैकी  झुनका-भाकर, भाजीपाला, विविध फळे, ताजे ज्यूस, दही-धपाटे, पुलाव, पाणीपुरी, क्लोड्रिंक्स तसेच विविध घरगुती पदार्थांना मोठी मागणी होती. या सर्व पदार्थांची तयारी, किंमत ठरवणे, स्टॉल सजावट, ग्राहकांशी संवाद, विक्री व हिशेब ठेवणे ही सर्व कामे विद्यार्थ्यांनी स्वतः पार पाडली. या उपक्रमाला 500 हून अधिक विद्यार्थी व सुमारे 1,000 पालकांनी भेट दिली. पालकांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांनी उभारलेल्या लघुउद्योगांचे कौतुक केले. परिणामी या 140 स्टॉलमधून 3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार, नफा-तोटा, ग्राहक समाधान आणि मार्केटिंगचे धडे अनुभवातून शिकता आले. माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना स्टॉल, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. शाळेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कुठेही गोंधळ न होता कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला. फन फेअर हा केवळ मनोरंजनाचा उपक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणारा आणि उद्योजकतेकडे नेणारा मंच ठरला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे संचालक ज्ञानेश्वर तांबे, नम्रता तांबे, मुख्याध्यापक सारिका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. समन्वयक रोहिणी गीते, दीक्षा हंबारे, सुषमा गाडे, माधुरी तांबे, अनिता जाधव, अर्चना गोरे, सना शेख, आफरीन शेख, अमोल शिरसागर, स्वाती भांडवलकर, अर्चना जोगदंड, जयश्री राऊत, पुनम वाघमारे, रोहिणी आघाव, मंजुश्री राग, ज्ञानेश्वर जरांगे, अशोक चौरे, प्रियंका पेंढारे, दत्ता काकडे, सत्यजित ठाकूर, वनिता काकडे, अश्विनी काकडे, स्नेहल जोशी, पल्लवी ढाकणे, प्रीती लामतुरे, आशा जाधव, सुमती कासलीवाल, गंगा शेनकुडे, दीक्षा वाघमारे, संघमित्रा गायसमुद्रे, दीपा आगलावे तसेच स्वाती ताई व अयोध्या ताई यांनी विशेष परिश्रम घेतले.

पालकांच्या प्रोत्साहनातून फन फेअर यशस्वी
पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक स्टॉलला भेट दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या विक्री कौशल्याचे, संवाद पद्धतीचे आणि स्वच्छतेचे पालकांनी विशेष कौतुक केले. केवळ खरेदी न करता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याने हा फन फेअर अधिक अर्थपूर्ण आणि यशस्वी ठरला.
 -ज्ञानेश्वर तांबे, संचालक

COMMENTS