Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा निवडणुकीत काँग्रेस-वंचितला मतदानाचे आवाहन -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

नांदेड । प्रतिनिधीगुजराती गाठी आणि फाफडा यांची जिरवणूक करायची असेल तर येत्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या

पुण्याऐवजी हडपसर स्थानकावरच मराठवाड्यातील रेल्वे गाड्या थांबवण्यात येणार
जिल्हा परिषदेच्या इमारतीत कचर्‍यांचे साम्राज्य; स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
धनशक्तीच्या दबावासमोरही शिवसेनेची लढत अखंड

नांदेड । प्रतिनिधी
गुजराती गाठी आणि फाफडा यांची जिरवणूक करायची असेल तर येत्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
शहरातील जेतवन मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस खा.प्रा. रविंद्र चव्हाण, माजी महापौर अब्दुल सत्तार, तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते. अ‍ॅड. आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरले. भारताचे शेजारी देशांशी संबंध बिघडले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहराच्या हितासाठी काँग्रेस-वंचित आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांनी भाजपवर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केला. काँग्रेस-वंचित युती भाजपच्या चुकीच्या धोरणांविरोधात असल्याचे स्पष्ट करत धनशक्तीला न घाबरता आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी महापौर अब्दुल सत्तार यांनीही युतीचे समर्थन करत जनतेने कोणत्याही जातीयवादी प्रचाराला बळी न पडता काँग्रेस-वंचित उमेदवारांना मतदान करावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम कांबळे यांनी केले.

COMMENTS