Homeताज्या बातम्याक्रीडा

व्हीनस विल्यम्सला ऑस्ट्रेलियन ओपनसाठी वाइल्डकार्ड एन्ट्री

नवी दिल्ली : टेनिसविश्‍वातील दिग्गज खेळाडू आणि सात वेळा ग्रँडस्लॅम विजेती व्हीनस विल्यम्स पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टवर झळकणार आहे. जाने

वर्तमान क्रिकेटमधील वादग्रस्त घटना व त्यांचे पडसाद 
‘‘मै झुकेगा नही…”, जडेजानं मैदानातच केली ‘पुष्पा’ची रावडी स्टेप | LokNews24
पुणे येथे लष्करी अधिकारी महिलेची आत्महत्या; वरिष्ठा विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : टेनिसविश्‍वातील दिग्गज खेळाडू आणि सात वेळा ग्रँडस्लॅम विजेती व्हीनस विल्यम्स पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टवर झळकणार आहे. जानेवारी 2026 मध्ये मेलबर्न येथे होणार्‍या या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी तिला मुख्य ड्रॉमध्ये वाइल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. 18 जानेवारीपासून सुरू होणार्‍या स्पर्धेत तब्बल पाच वर्षांनंतर तिचे हे पुनरागमन असणार आहे.
विशेष म्हणजे, 45 वर्षांच्या व्हीनस विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत खेळणारी आतापर्यंतची सर्वात वयस्कर महिला टेनिसपटू ठरणार आहे. याआधी हा विक्रम जपानच्या किमिको डेटच्या नावावर होता. 2015 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी किमिको डेटने मेलबर्न पार्कमध्ये सहभाग नोंदवला होता. व्हीनसने हा विक्रम मोडत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियात परतण्याबाबत आनंद व्यक्त करताना व्हीनस म्हणाली, मेलबर्नशी माझ्या अनेक अविस्मरणीय आठवणी जोडलेल्या आहेत. या संधीबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. विशेष म्हणजे, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यानंतर काही दिवसांतच ती पुन्हा स्पर्धात्मक टेनिसमध्ये उतरणार आहे. स्पर्धा आयोजकांच्या माहितीनुसार, व्हीनसचे हे पुनरागमन तिच्या ऑस्ट्रेलियन ओपन पदार्पणानंतर तब्बल 28 वर्षांनी होत आहे. 1998 मध्ये तिने या स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग घेतला होता. त्या वेळी दुसर्‍या फेरीत तिने धाकटी बहीण सेरेना विल्यम्सचा पराभव केला होता. मात्र उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या लिंडसे डेव्हनपोर्टकडून तिला पराभव पत्करावा लागला.
व्हीनस विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपन एकेरीच्या अंतिम फेरीत दोनदा धडक मारली आहे. 2003 मध्ये सेरेना विरुद्ध आणि पुन्हा 2017 मध्ये तिने अंतिम सामना खेळला होता. आतापर्यंत या स्पर्धेत तिचा एकूण विक्रम 54 विजय आणि 21 पराभव असा आहे. आगामी स्पर्धा तिचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील 22 वा मुख्य ड्रॉ सामना ठरणार आहे. ती शेवटची 2021 मध्ये मेलबर्नमध्ये खेळली होती. त्यानंतर तिने नियमित व्यावसायिक टेनिसपासून विश्रांती घेतली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात तिने पुनरागमनाचे संकेत दिले होते.

COMMENTS